<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये आज आंतरविद्यापीठ खेळाडूंचा गौरव करण्यात आला. आय एम आर च्या डायरेक्टर डॉक्टर शिल्पा बेंडाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत झालेल्या विविध आंतरमहाविद्यालयीन व आंतर विद्यापीठ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठ संघात स्थान पटकाविले.
या वर्षी सन 2021/ 22 मध्ये एकूण 12 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सहभाग नोंदविला. यात विनिता गोपीचंद पाटील यांची रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटी गुवाहाटी येथे झालेल्या बेसबॉल आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आयुष्य सुहास चव्हाण या विद्यार्थ्याचे पूर्णिमा युनिव्हर्सिटी जयपुर राजस्थान येथे झालेल्या आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत निवड करण्यात आली. भूमीशा वाईडे व गौरी बैरागी या विद्यार्थिनींची गुरू नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे झालेल्या तलवारबाजी आंतरविद्यापीठ स्पर्धेत निवड करण्यात आली. मयूर ईश्वरलाल वाघे यांची आर टी युनिव्हर्सिटी ग्वालियर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. निरंजन ढाके, रोहन कुरकुरे, व नयन महाजन या तीनही विद्यार्थ्यांची डॉ. हरिसिंह गौर यूनिवर्सिटी सागर मध्य प्रदेश येथे झालेल्या आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत निवड करण्यात आली. शितल निळकंठ रूले हिची कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी कुरुक्षेत्र येथे झालेल्या आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत निवड करण्यात आली.
खेकारे shreyang याची केरला युनिव्हर्सिटी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या तायक्वांदो आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. चौधरी ऋषिकेश याची विद्यापीठ विद्यापीठ नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेश येथे झालेल्या आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मोरे आदित्य याची सुरेश ज्ञान विहर विद्यापीठ जयपुर राजस्थान येथे होणाऱ्या मिनि गोल्फ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी क्रीडा संचालक प्रा. नीलिमा पाटील उपस्थित होत्या.