<
जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :- अनुसूचितजाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत या करीता राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 6 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने वक्तृत्वस्पर्धा व निंबधस्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून. सहभाग घेणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी भाषणाचे व्हिडीओ सुस्पष्ट आवाजासह तसेच लेखी निबंध PDF स्वरुपात मोबाईल नं. 8668758663 या WhatsApp No वर दिनांक. 20 एप्रिल, 2022 पर्यंत पाठवावेत तसेच स्पर्धकांनी व्हिडीओ पाठवितांना खालील माहिती देखील सोबत देणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी – नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा गट, विषय, – या बाबींचा सुस्पष्ट उल्लेख करावा.
स्पर्धेसाठी गट निहाय चिषयसुची याप्रमाणे
स्पर्धेचा प्रकार – वक्तृत्व स्पर्धा- गट – 6 वी ते 8 वी- विषय – 1) मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय 2) लोकशाहीत समतेचे महत्व , वेळ / शब्द मर्यादा – 3 मिनिट
इ. 9 वी ते 10 वी साठी – विषय – 1)अरे माणसा माणसा कधी होशील माणूस 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग – वेळ / शब्द मर्यादा – 5 मिनिट
इ. 11 वी ते 12 वी – 1) समतेचे हे तुफान ऊठवू 2) सामाजिक न्याय आणि समता, वेळ / शब्द मर्यादा – 7 मिनिट
पदवी व पदवीत्तर – 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत 2) आधुनिक राष्ट्र उभारणी महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, वेळ / शब्द मर्यादा – 7 मिनिट
शिक्षक व शिक्षकेत्तर – 1) गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी 2) समता: लोकशाहीतील महत्व, दशा आणि दिशा वेळ / शब्द मर्यादा – 10 मिनिट,
2) निबंध स्पर्धा – इ– 6 वी ते 8 वी- विषय – 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलु 2) महापुरुषांची गावू गाथा, आदराने टेकवू माथा वेळ / शब्द मर्यादा – 350 शब्द
इ. 9 वी ते 10 वी साठी – विषय – 1)समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) मानवता हाच धर्म माणुसकी हीच जात – वेळ / शब्द मर्यादा – 500 शब्द,
इ. 11 वी ते 12 वी – 1) समता : सामाजिक वास्तव एक चिंतन 2) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वेळ / शब्द मर्यादा – 700 शब्द,
पदवी व पदवीत्तर – 1) घटनाकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) स्वातंत्र समता बंधुता : परस्पर संबंध, वेळ / शब्द मर्यादा – 1000 शब्द,
शिक्षक व शिक्षकेत्तर – 1) वर्ग, वर्ण, लिंग आणि जात: सामाजिक परिभाषा 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता… काल, आज आणि उद्या, वेळ / शब्द मर्यादा – 1000 शब्द,
सदर स्पर्धेत प्रत्येक गटातून तीन स्पर्धेकांसाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.