<
जळगाव,दि.१४ (प्रतिनिधी): खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे, मूळजी जेठा महाविद्यालयात मानव्यविद्याशाखेच्या वतीने आयोजित भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व्रत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने ‘ महाविद्यालयात विशेष व्याख्यान आणि भीमगीत गायन व काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रथमतः भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व्रत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व त्यानंतर त्रीशरण, पंचशील व बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कविवर्य श्री.शशिकांत हिंगोणेकर हे होते.
यावेळी कविवर्य श्री.शशिकांत हिंगोणेकर यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. या व्याख्यानातून त्यांनी धर्मांतराची घोषणा, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह , नाशिक काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, धम्म दीक्षा अशा अनेक घटना प्रसंगाविषयी माहिती दिली. या बरोबरच डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेली पत्रे यांचे संदर्भ देत त्यांचे विचार, कार्य व त्यांच्या जीवनातील आठवणीना उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सं.ना.भारंबे हे होते. प्रा.डॉ.सं.ना.भारंबे भारंबे यांनी यावेळी बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन केले. व या प्रसंगी महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित सर्वाना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ऋषिकेश वाघ, रोहिणी गवळी, सम्यक मेढे, चंदन भामरे, दिपक नाईक, अविनाश तायडे, विशाल लोखंडे, शुभम मनुरे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील भीमगीते सादर केली. त्याचं बरोबर गोपाळ बागुल,कुमुदिनी पाटील. या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यावेळी भाषा प्रशाळा संचालक, प्रा.डॉ. भूपेंद्र केसुर , सामाजिक शास्त्रे प्रशाळा संचालक , प्रा. देवेंद्र इंगळे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री.जगदीप बोरसे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंद्रमणी लभाने, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संजय हिंगोणेकर, प्रा.राजीव पवार, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. मनोज महाजन, प्रा. वसावे,प्रा.कुणाल वानखेडे, प्रा.राहुल सुरळकर प्रा.सगळगिळे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ.विलास धनवे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.