<
पाडळसे – (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास पाडळसे गावातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आज दिनांक १४-एप्रिल २०२२ वार गुरुवार रोजी विकास कार्यकारी सोसायटी, पाडळसे तालुका यावल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन केले होते.सदर शिबिरात ११५ सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदू निदान झालेल्या ११ रुग्णांनाची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ रोहित गैत्मम यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी पाडळसे गावाचे उपसरपंच खेमचंद कोळी, डॉ कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मार्गदर्शन केले.
आधार नसलेल्या वृध्दांच्या हाताला आधार कुणी द्यावा या वेळी डॉ.कुंदन फेगडे यांनी रुग्ण बांधवांना आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि आजकाल वृद्ध आई वडील मुलांना नकोसे वाटतात त्यांना सांभाळणं नको वाटतं आशा वेळी आधार नसलेल्या हाताला आधार कुणी द्यावा., आशा प्रश्न मला कायम पडायचा म्हणून मी व माझा मित्र परिवाराच्या सहकार्याने संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ठे डोळ्यांसमोर ठेऊन हे कार्य हाती घेतले व माझा संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात आता पर्यत २१ शिबिराच्या माध्यमातून वृद्ध सेवा करण्याचे भाग्य मला व माझ्या मित्र परिवाराला लाभले.
जो पर्यत संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त होत नाही तो पर्यत हि सेवा व कार्य अपूर्ण सोडणार नाही अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाडळसे गावाचे सरपंच ज्ञानेश्वर तायडे होते, तर कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या वेळी डॉ.कुंदन फेगडे, ज्ञानेश्वर तायडे (सरपंच ) खेमचंद कोळी (उपसरपंच ) डॉ उदय चौधरी राहुल पाटील (माजी प्रभारी उपसरपंच ) सुरेश खैरनार ( पोलीस पाटील ) मुकुंदा कोळी वासुदेव कोळी आरिफ पटेल शेखर तायडे शांताराम कोळी. नथू कोळी किशोर कोळी सय्यद नूर बापूभऊ तायडे तसेच गावातील जेष्ठ प्रतिष्टीत सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला डॉ.कुंदन दादा फेगडे यांचे संपर्कप्रमुख सागर लोहार, मनोज बारी , विशाल बारी, राहुल पाटील आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले