Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची स्वछता मोहिमेने सांगता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची स्वछता मोहिमेने सांगता

योगदान दिलेल्या सर्वांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले आभार

मुंबई (दि. 16) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल असे सलग 11 दिवस राज्यभरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची आज सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून सांगता करण्यात आली.

विविध शहरातील महापुरुषांची स्मारके, बाजारतळ, जलाशय परिसर, प्रमुख रस्ते, चौक, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यामध्ये विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले.

मागील दोन वर्षात कोविड निर्बंधांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सार्वजनिक रित्या साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी धनंजय मुंडे यांनी राज्यभरात जयंती उत्सव शासकीय स्तरावरून साजरा करण्याची अनोखी संकल्पना राबवली होती.

याअंतर्गत मागील 11 दिवस राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून समाज कल्याण कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, व्याख्याने, मार्जिन मनी, मिनी ट्रॅक्टर यांसारख्याविविध योजनांच्या सामूहिक व व्यक्तिगत लाभ वितरणाचे कार्यक्रम, विविध योजनांबद्दल जनजागृती, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे भव्य कार्यक्रम यांसारखे अनेक कार्यक्रम राज्यभरात राबवण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या मागील 11 दिवसातील सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व भीम अनुयायांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

Next Post

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत अधिकारी गटात जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत अधिकारी गटात जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo