<
6 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत सामाजिक सप्ताह राबविण्यात आला
जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : – दि.06 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग जळगाव यांचेमार्फत राबविण्यात जात प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्यानुंषगिक माहिती संदर्भात विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कार्यक्रम राबविण्यात आले.
मागासवर्गीय विद्वयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सोपे व्हावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वेळेत प्रमाणपत्र मिळावे जेणेकरुन त्यांचे भविष्यात नुकसान होणार नाही हा या सप्ताहाचा प्रमुख उ्ददेश आहे. या सामाजिक सप्ताहात तालुका स्तरावरील संबंधित महाविदयालयात खालीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
1. त्रिमूर्ती पॉलीटेकनिक कॉलेज, पाळधी,ता.धरणगाव दि. 08/04/2022
2. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव दि. 13/04/2022
3. नूतन मराठा महाविदयालय, जळगाव दि. 14/04/2022
4. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव दि.14/04/2022
5. एम.जे.कॉलेज, जळगाव दि. 16/04/2022
तसेच दिनांक – 12 एप्रिल, 2022 रोजी ऑनलाईन जिल्हयातील महाविदयालयाचे प्राचार्य, संबंधित लिपीक व विदयार्थी यांचे वेबिनारसुध्दा आयोजित करण्यात आलेले होते. या वेबिनारमध्ये मुख्यता विदयार्थ्याना जात पडताळणी अर्ज भरतांना येणाऱ्या प्रमुख अडचणी, त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दिनांक 14 एप्रिल, 2022 रोजी जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे प्रतिनिधीक स्वरुपात मा.जिल्हाधिकारी महोदयांचे शुभहस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे दिनांक – 12 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत जात पडताळणीचे अर्जातील त्रृटीची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहित राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विदयार्थ्याना प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्या समजावून सांगण्यात आल्या तसेच त्यांचे अर्जात ज्या तृटी आहेत त्या तृटींची वेळीच पूर्तता करण्याबाबतसुध्दा त्यांना आवाहन करण्यात आले. यामध्ये
दिनांक – 06 ते 16 एप्रिल, 2022 या दरम्यान राबविण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहामध्ये विशेष बाब म्हणून तपासणी करुन 1237 इतके अर्ज वैध ठरविण्यात आले.
मागील 5 महिन्यात 15000 वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन निर्गमित करण्यात आले.