<
जामनेर – (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आयोजित करण्यात आले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी जि.प.सदस्य अमित देशमुख,महात्मा फुले जनारोग्य कमल हॉस्पिटल चे डॉ.प्रशांत भोंडे,जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे,डॉ.हर्षल चांदा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,डॉ.राहुल निकम,डॉ.पंकज माळी,डॉ.मनोज पाटील डॉ.वैशाली चांदा,डॉ.राहुल माळी आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व तपासणीला आलेले रुग्ण यांची उपस्तीती होती.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्व तपासणी करून मोठ्या संख्येने रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले होते.
आरोग्य शिबिरात एकूण ५६० लाभार्थ्यांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली.
२१२ रुग्णांनी युनिक हेल्थ आय डी कार्डसाठी नोंदणी केली.
१२३ जणांना “आयुष्यमान भारत”योजनेचे कार्ड वाटण्यात आले.
या शिबिरात सर्व रुग्णांची मोफत तपासणी,मोफत रक्त चाचण्या विशेष तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
यामध्ये हृदय रोग,मधुमेह,रक्तदाब,मेंदूचे आजार,फुफ्फुसांचे आजर,कोरोना नंतर उदभवलेल्या समत्स्या, स्त्री रोग,किडनी आजार,मोतीबिंदू,
नाक कान घसा,अस्थीरोग,कुष्ठरोग,क्षयरोग,दंतरोग,कॅन्सर
एच.आय.व्ही. इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली.
तसेच मोफत रक्त लघवी एक्स रे,ईसीजी तपासणी करून गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व ५१ नागरिकांचे मोतीबिंदू चे ऑपरेशन करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय येथील हजार लिटर ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्ररोग तंत्रद्य पांडुरंग आल्हाड, आयुष्यमान भारत व आरोग्य शिबिराबाबत प्रास्ताविक डॉ.पंकज पाटील
तर आभार डॉ.राजेश सोनवणे
यांनी मानले.