<
जळगाव – खान्देशातील व्यवस्थापन शिक्षण देणारी अग्रगण्य आणि संस्थापक संस्था अशी ओळख असलेल्या के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिटूट ऑफ मानजमेंट अँड रिसर्च अर्थात आय एम आर जळगावचा वार्षिक महोत्सव ”सिनर्जी २०२२” ला आज दणक्यात सुरवात झाली मागील दोन दिवसात क्रीडा वेध मध्ये विविध क्रीडा प्रकारांच्या या उपक्रमानंतर आज दि २४ एप्रिल २०२२ रोजी सिनर्जी ह्या सांस्कृतिक कलागुणांच्या महोत्सवाला सुरवात झाली दि २४ ते २७ एप्रिल ह्या कालावधीत संस्थेत शिकणारे विध्यार्थी आपल्या विविध कलागुणांची सादरीकरण करतील शेवटच्या दिवशी विविध बक्षिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्कृस्ट कलागुणांचा सन्मान करण्यात येईल.
सिनर्जी २०२२ चे औपचारिक उदघाटन आज सकाळच्या सत्रात करण्यात आले उदघाटक म्हणून केसीई सोसाटीचे प्रशासकीय अधिकारी श्री शशिकांत वडोदकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका प्रा डॉ शिल्पा बेंडाळे संस्थेच्या अकॅडेमिक डीन प्रा तनुजा फेगडे उपस्थित होते दीप प्रज्वलनाने ह्या औपचारिक समारंभाला सुरवात झाली कार्यक्रमाच्या प्रस्थावनेत प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी सिनर्जीच्या आयोजनामागचा उद्देश विशद केला. महामारीनंतर दोन वर्षांनी आज विध्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा ह्या संधीचा पुरेपूर उपयोग घेऊन ह्या सिनर्जीचं भरपूर आनंद ग=घ्या असं म्हणत त्यांनी विद्याथाना पुढील तीन दिवसांसाठी शुभेच्छा दिल्या.
उदघाटन श्री वडोदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेरोशायरीचा भरपूर उपयोग करत उदघाटनाची कार्यक्रमात वेगळीच रंगात आणली तारुण्य प्रत्येकाचं उत्साह आणि ऊर्जेने भरलेले असते. तेव्हा ह्या ऊर्जेचा भरपूर उपयोग करून घ्या कार्यक्रमाची भरपूर मजा लुटा असा सल्ला त्यानी दिला माझेसोबतच त्यांनी चार युक्तीच्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवण्याची विनंती त्यानी केली. त्यात जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित करा, वाणी विचार आणि वर्तन यांच्यात साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थापन शाश्र शिका आणि किती मोठे झालात तरी आपण माणूस आहोत हे विसरू नका असा मौलिक सल्ला त्यांनी विध्यार्थ्यांना दिला.
मु जे महाविद्यालयाला सातत्याने युवारंग या विद्यापीठ स्तरीय सांकृतिक युवा महोत्सवात विजेते पद मिळत आलेले आहेत आणि त्यात माझे ९० टक्के योगदान असल्याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे अशा कार्यक्रमात काय ऊर्जा ? काय जल्लोष आणि काय चढाओढ असते याची मला पूर्ण कल्पना आहे असे सांगत ”सिनर्जी २०२२” उदघाटन झाले असे जाहीर केले.
उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन रिद्धी चोपडा तर आभार प्रदर्शन शंतनू निकुंभ ह्या विध्यार्थ्यानी केले. उदघाटन समारंभानंतर विविध व्यासपीठावरून विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाला सुरवात झाली . ह्यात रांगोळी, फेस पेंटिंग, गीतगायन,नृत्य सादरीकरण करण्यात आले सर्वच कलाप्रकारामध्ये विध्यार्थ्यांना भरभरून प्रतिसाद लाभला. पर्यावरण संरक्षण ह्या संकल्पनेवर विध्यार्थ्यानी विविध रांगोळ्या देश, समाज, सामाजिक प्रश्नांना घेऊन विध्यार्थ्यानी आपले चेहरे ‘फेस पेंटिंग’ मध्ये रंगविले. विध्यार्थ्यांच्या ह्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने इतर पाहणारे चकित झाले.
सर्वात जास्त रंगत आणली ती दुपारच्या सत्रात सादर झालेल्या कार्यक्रमांनी तह्यात पारंपरिक वेशभूषा परिधान करीत विध्यार्थ्यानी रॅम्प वाक केला ह्या आगळ्या वेगळ्या प्रकारातून संपूर्ण भारत देशातील वेशभूषा आय एम आरच्या व्यासपीठावरून पाहण्याची मजा आली. फक्त फॅशन शो न घेता या कार्यक्रमातून भारतातील वेगवेगळ्या वेशभूषेची माहित विध्यार्थ्यांना मिळाली ह्याचे विध्यार्थ्यांना समाधान वाटले.
लैला ओ लैला, तुने ओ रंगीला, ते झिंगत पर्यंतचे विविध म्युझिकल हॉट गाणे विध्यार्थ्यानी सादर केलेत . विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे मंडपातील इतरांनी चांगलंच ठेका धरला होता. गीत गायन पाथोपाढंच वेगवेगळ्या हिंदी मराठी गाण्यांवर विध्यार्थ्यानी अप्रतिम असे नृत्य सादर केलेत. एकूणच गीत गायन व नृनत्य प्रकारची तप्त उन्हाची जणी विसरत सर्व विध्यार्थ्यानी प्रचंड प्रमाणात ऊर्जा दाखवत सदारकऱ्यांसोबत मजा लुटली . उद्या २६ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी मेहेंदी , ऍड म्याड शो, मॉक प्रेस कॉन्फरेन्स ह्या कलागुनाचे सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक उपक्रमासोबरच सामाजिकतेचे जाणीव विध्यार्थ्यांना करून देण्यासाठी दि २७ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचेही आयोजन आले आहे.
आज झालेल्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी संचालक प्रा शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा पराग नारखेडे, प्रा. ममता दहाड, डॅा. योगेश पाटील, रुपाली नारखेडे, प्रा चारुता खडके, प्रा श्वेता फेगडे, प्रा योगेश्वरी यावलकर, प्रा अनिलकुमार मराठी , प्रा अनुपम चौधरी प्रा दीपाली पाटील प्रा कविता पवार ह्यांचे सोबत कोमल जावळे कोमल पाटील पूजा मराठे श्वेता भावसार हृतिक मायकल शंतनू निकुंभ , सागर सैतवाल, प्रगती बुवा , गायत्री बाविस्कर, लाभेश संखला, रक्षिता टंडन, देवांशी मिस्त्री, ह्या विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.