Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा;मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा;मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
1

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

मुंबई, दि.२६: जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत ३४ गावे प्रकल्पबाधीत असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पुर्ण करण्यात आली आहेत यामध्ये नव्याने १२ गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट असा प्रस्ताव सादर करा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज बैठकीत दिले.

मंत्रालयासमोरील सिंहगड निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,पाटोळाचे आमदार चिमणराव पाटील,पुनवर्सन विभागाचे उपसचिव धनंजय नायक,जळगावचे अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन,रविंद्र भारदे,कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी,नाशिक महसूलचे उपायुक्त गोरस गाडीलकर यावेळी उपस्थित होते.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,शासनाने ३४ गावे पुनर्वसीत करण्यासाठी ४० कोटी रूपयांची मान्यता दिली आहे.या ३४ गावांमध्ये काही नागरी सुविधांची कामे पुर्ण झालेली आहेत. पुनर्वसन गावांतील पुर्ण झालेली नाहीत अशी कामे तसेच ज्या कामांची दरवाढ झाली असून या कामांसाठी लागणारा अतिरिक्त निधी,नव्याने जी गावे पुनर्वसनामध्ये समाविष्ट करायची आहेत त्या १२ गावांचा सुस्पष्ट प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.ही कामे वेगोने पूर्ण करून या पुनर्वसीत गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत दिली.


हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाच्या गावांच्या प्रस्तावातील कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा :- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, हतनूर प्रकल्पातील पुनर्वसीत गावांची नागरी सुविधांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच शासनाकडून या ३४ गावांच्या कामासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद केली होती मात्र दरवाढीमुळे या कामांसाठी अधिकचा निधी लागणार आहे त्याचबरोबर हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत नव्याने १२ गावांचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.या कामांना तातडीने निधी देवून ही कामे गतीने पूर्ण करावीत अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

Next Post
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा - प्रा. रेखा भोळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo