<
जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगावमार्फत दिव्यांगांना देण्यात येणारे ओळखपत्र 11 मे, 2022 पासून बंद करण्यात येत आहे. त्यानंतर कोणत्याही दिव्यांगाना ओळखपत्र दिले जाणार नाही यांची नोंद घ्यावी.
त्या व्यक्तीकडे या पुर्वीचे ओळखपत्र आहे ते मुदत असे पर्यंत ग्राहय धरण्यात यावे. तसेच बस सवलत व इतर सवलतीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.