<
दिनांक 1 मे 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सामाजिक ) व समता सैनिक दल च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व परिसरातील बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केले होते. शिबिराचे उदघाटन जळगांव शहर महानगरपालिका चे उप महापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभाताई बारी, हसीना बी शेख ,विनोद निकम ,जाकीर पठाण ,मोहम्मद नूर यांची होती. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सामाजिक ) अध्यक्ष विजय निकम यांनी केले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आजचा हा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम देशाला व राज्याला संदेश देणारा ठरत आहे.
आज देशात व राज्यात धर्मांध राजकारण सुरू आहे. या धर्माध राजकारणामुळे देशातील व राज्यातील सामाजिक परिस्थिती वर परिणाम होत आहे. या अनुषंगाने देशाला जर 70 वर्ष एकसंघ ठेवण्याचे काम कोणी केले असेल तर, भारतीय संविधानाने या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ,न्याय ही मूल्य आम्ही जपली पाहिजे. हा संदेश देण्याचे मोठे कार्य समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असे कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविले गेले पाहिजे. असे प्रतिपादन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात केले. त्याच बरोबर साफ सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. व परिसरातील शेकडो नागरिकांना भारतीय संविधान प्रास्ताविक वाटप करण्यात आली. क
कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बंटी बारी, शफी शेख, सुनील सुरवाडे ,अमर गायकवाड,भगवान थाटे, सचिन सोनवणे ,रोहित पगारे, भोजराज सोनवणे, संजय अहिरे , सुखदेव सपकाळे, शांताराम अहिरे, गौतम बाविस्कर, संजय सोनावणे, दीपक सोनावणे, जयेश सोनवणे, नरेश वाघ, सदानंद सपकाळे, आनंद मरसाळे, कॉम्पुटर ऑपरेटर जितू शिरसाट यांचे शिबिराला सहकार्य लाभले.आभार अमर गायकवाड यांनी मानले.