<
बांभोरी प्रचा ग्रामपंचायत,आरोग्य उपकेंद्र,व समता फौंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षणाचे जनक,महान समाज उद्धारक,कल्याणकारी लोकराजा, छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर भोकणी गावात संपन्न झाले.
भोकणी गावातील कमी वजनाचे कुपोषित बालक,अति जोखमीच्या गर्भवती माता,स्तनदा माता,यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले.
अश्या प्रकारे आरोग्य शिबिराचा लाभ गावातील बालक,महिला व नागरिकांनी घेतला .कल्याणकारी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोककल्याणकारी राजा, छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी
श्री.सचिन बिऱ्हाडे-बांभोरी प्रचा सरपंच
डॉ.प्रीती पाटील-आरोग्य अधिकारी
श्री.राजेंद्र दोंड-समता फौंडेशन, मुंबई
श्री.प्रशांत पाटील-MPW
सौ.प्रीती निकम-ANM
श्री.अमोल नन्नवरे-ग्रामपंचायत सदस्य
सौ.सोनी नन्नवरे,आशा सेविका
अंगणवाडी सेविका,बालक, महिला,व भोकणी ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.