<
भडगाव – (प्रतिनिधी) – येथुन जवळच असलेल्या क. ता. ह. रा. पा. कि. शि. संस्था, भडगाव,संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.आज चाळीसगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १९ वर्षाआतील ग्रीकोरोमन प्रकारात चेतन अशोक पगारे याने ५५ कि.ग्रॕ.वजनी गटात तर चेतन नेहरु पाटील ६३ कि.ग्रॕ.वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला,तर ६० कि.ग्रॕ.गटात योगेश ओंकार खैरणार व ५७ कि.ग्रॕ.मध्ये सुशिल विकास पाटील उपविजयी ठरले तसेच फ्री स्टाईल गटात ६५ कि.ग्रॕ.मध्ये कमलेश्वर पगारे व विशाल दिपक देसले ५७ कि.ग्रॕ.वजनी गटात उपविजयी ठरले.यात दोन विजयी खेळाडूंची विभागीय पातळीसाठी होणाऱ्या शासकीय कुस्ती स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या संघात निवड झाली असून सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री बी.डी.साळुंखे, आर.एस.कुंभार, राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील, डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.