<
जळगाव-(प्रतिनिधी)-तालुक्यातील पडसोड ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या प्रथम अपील निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार घडलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विकास बाविस्कर रा.नारणे तालुका धरणगाव, यांनी दिनांक २३-०५-२०१९ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ अन्वये अर्ज करून माहिती मागितली होती.
सदर माहिती मध्ये त्यांनी ग्रामपंचायतीचे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती मागितली होती. तसेच दुसऱ्या अर्जात ग्रामपंचायतीचे पासबुक व कॅशबुक बाबत माहिती मागितली होती. परंतु सदर ग्रामसेवक तब्ब्ल ८ दिवस ग्रामपंचायत ला गैरहजर असल्याने पोस्टाने पाठवलेला अर्ज परत आला व त्यामुळे माहिती मिळू शकली नाही,त्यामुळे अर्जदार विकास बाविस्कर यांनी जळगाव येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा प्रथम अपील अधिकारी जळगाव यांच्याकडे दिनांक ०२-०७-२०१९ रोजी प्रथम अपील अर्ज दाखल केला त्यावर त्यांनी दिनांक १३-०८-२०१९ रोजी प्रथम अपील सुनावणी घेण्यात आली होती.सदर सुनावणीस ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे देखील अर्जदार यांनी सांगितले आहे.
प्रथम आपिल अधिकारी यांनी ग्रामसेवकास दिनांक ०३-०९-२०१९ पूर्वी विनामूल्य पुरविण्याचे लेखी आदेशित केलेले आहे. तरी देखील अद्याप अर्जदारास कोणतीच माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.
सदर माहिती न दिल्याने पडसोड ग्रामपंचायतीच्या कारभारावर मात्र संशय निर्माण होत आहे. माहिती न मिळाल्याने अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केलेले आहे.
विस्तार आदिकार्यांनी आदेशित करून देखील माहिती देत नाहीत त्यामुळे त्यांचा आदेशाला केराची टोपली दाखवली असेच म्हणावे लागेल.