<
पाचोरा (वार्ताहर) दि,१९
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार,संपादक, साहित्यिक तथा ‘आम्ही भारताचे लोक’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक संजय आवटे यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवारी संध्याकाळी ७ वाजता शहरातील हुतात्मा स्मारक येथे हे व्याख्यान होणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दिलीप वाघ, प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, पीटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ,तहसीलदार कैलास चावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख, पीपल्स बँकेचे माजी चेअरमन अशोक संघवी,आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, बाजार समिती प्रशासक रणजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ऍड अभय पाटील, प्रा.गणेश पाटील, पप्पू राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर खान, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, ए बी अहिरे, जय वाघ, प्राचार्य वासुदेव वले, अविनाश सावळे,नितीन पाटील ऍड अनिल पाटील,ऍड रोहित ब्राह्मणे,पत्रकार किशोर रायसाकडा, जेष्ठ पत्रकार विनायक दिवटे,लक्ष्मण सूर्यवंशी,श्यामकांत सराफ,प्रा.सी एन चौधरी, मिलिंद सोनवणे,सुनील पाटील, अनिल येवले,योगेश पाटील, नगराज पाटील, नंदकुमार शेलकर, आत्माराम गायकवाड,निखिल मोर, बंडू सोनार, नरसिंग भुरे, सुरेश तांबे,गणेश शिंदे,फकिरचंद पाटील, उमेश राऊत, प्रा.शिवाजी शिंदे , दिलीप जैन , प्रमोद पाटील , प्रमोद बारी , व प्रमोद सोनवणे आदींची उपस्थिती राहणार आहे.तत्पूर्वी शहरातील मा.गांधी वाचनालयात श्री आवटे हे तालुक्यातील पत्रकारांशी औपचारिक संवाद साधणार असुन बदलती पत्रकारिता, पत्रकारितेसमोरील आव्हाने आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ,पाचोरा तालुका पत्रकार संघ,भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य पत्रकार बांधव सहभागी होणार आहेत.
वरील कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, सचिव मिलिंद तायडे, खजिनदार राजू सोनवणे, उपाध्यक्ष आकाश ननावरे, शुभम खर्चाणे, अमोल कदम, अनुराग खेडकर, अमोल पवार, सिद्धार्थ नरवाडे, सागर गायकवाड, संदीप गायकवाड, विजय गायकवाड, कमलेश अहिरराव सचिन ननावरे, आकाश थोरात ,सागर अहिरे आदींनी केले आहे.