<
विवाह होणाऱ्या वधुस ५५भांडीचे सेट देतांना अब्दुल रऊफ सोबत फारूक शेख,ताहेर शेख,अख्तर शेख,मोहसीन युसूफ आदी दिसत आहे
जळगाव-(प्रतिनिधी) – येथे दोन गरीब कुटुंबातील मुलींचा विवाह २२ मे रोजी होणार आहे परंतु त्या दोघी कुटुंबातील नवविवाहितांना देण्यासाठी त्यांच्या पालकांकडे काही व्यवस्था झाली नाही खास करून भांडी ची व्यवस्था होऊ शकत नाही असा निरोप एम आय एम चे इम्रान खान व अक्सा मशिदीचे ट्रस्टी निहाल अहमद यांनी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना दिला असता त्यांनी त्वरित या दोघी कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्या दोघी विवाह होणाऱ्या वधूना आवश्यक ती भांडी घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केले.
यावेळी मन्यार बिरादरीचे खजिनदार ताहेर शेख, सहसचिव अब्दुल रऊफ रहीम, युवा बिरादरीचे मोहसिन शेख, यांच्यासह मुजाहिद खान व अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती.
मानियार बिरादरीचे आवाहन
गरीब व गरजवंत वधूना भांडी, कपडे व इतर महत्व पूर्ण वस्तू लागत असतील तर त्यांनी मानियार बिरादरीशी रथ चौक कार्यालय,जळगांव येथे संपर्क साधावा परंतु वधू कडील पालकांनी जेवणावळीवर फालतू खर्च करता कामा नये अन्यतः अशा वधू च्या पालकांनी संपर्क करू नये असे अध्यक्ष फारूक शेख,सचिव अझीझ शेख व उपाध्यक्ष सैयद चाँद यांनी एका पत्रका द्वारे कळविले आहे.