<
न्याय न मिळाल्यास अतितिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल – तालुकाध्यक्ष विशाल तात्या बागुल
पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका तर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाराज साहेब जळगाव यांना पाचोरा नगर पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व भिकन गायकवाड आणि आदिवाल ह्या दोन्ही सफाई कामगार यांच्या विरोधात ,पदाचा दुरुपयोग करुन समाजात जातीभेद करुन तेढ निर्माण करण्याचं काम नगर पालिका प्रशासन करीत आहे असे तक्रारी निवेदन देण्यात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की , पाचोरा शहरात शितल हाॅटेल व शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रहदारीला कसलाही अडथळा निर्माण होत नाही व कुणालाही हरकत नाही अशा ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगार युवक हे हात गाडी वरती फळ विक्री करुन स्वाभिमानाने आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवत असतात पण नगर पालिका सफाई कामगार 1- भिकन गायकवाडांनी व 2- आदिवाल ( पूर्ण नाव माहीत नाही,) हे फळ विक्रेत्यां कडे येऊन रोज पैशांची मागणी करतात आणि नाही दिले तर फळ विक्री चे काटे व माप उचलुन नगर पालिकेत घेऊन जातात त्यांची तक्रार मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , नगर पालिका यांना केली असता ते म्हणतात की हे कर्मचारी जे करत आहे ते बरोबर आहे यांची तक्रार घेऊन जर माझ्या कडे परत आले तर तुमच्यावरच कलम-३५३ दाखल करून जेल मध्ये सडवेल असेही तक्रारी अर्जात म्हटले आहे.
पाचोरा येथील शिवाजी महाराज चौक ते नगर पालिका समोर व रेल्वे स्टेशन रोड वरती पाणी पुरी वाले,भेळ वाले, मोबाईल कव्हर वाले पान टपरी वाले,चहा वाले, गोटी सोडा दारु घेऊन बसतात, सट्टा टपरी वाले, फुल माळा वाले असे बरेच छोटे धंद्यावाले रोडावर बसत असतांना नगर पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व सफाई कामगार भिकन गायकवाड आणि आदिवाल यांना या अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगार हात गाडी वरती फळ विक्री करणारे युवकच कसे काय दिसतात हे कर्मचारी रोडावर कुणालाच त्रास न देता ,फक्त अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगार तरुणांना च टार्गेट केले जाते आहे असेही त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
नगर पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व सफाई कामगार भिकन गायकवाड आणि आदिवाल यांची खाते निहाय चौकशी करून निलंबित करण्यात यावे करीता वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा तर्फे पाचोरा तालुका अध्यक्ष श्री विशाल तात्या बागुल व पाचोरा तालुका महासचिव श्री दिपक परदेशी यांनी तक्रार निवेदनात मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास अतितिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडी ही या अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगार युवकान सोबत ठाम पणे उभे आहे कुणी जातिभेद करुन या अल्पसंख्याक मुस्लिम बेरोजगार तरुणांना त्रास देत असेल तर हे यापुढे खपवून घेतलें जाणार नाही असे मत वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल तात्या बागुल यांनी व्यक्त केले.