Tuesday, July 22, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कला ही कालातीत, ईश्वराचे देणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2022
in राज्य
Reading Time: 2 mins read
कला ही कालातीत, ईश्वराचे देणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

बॉम्बे आर्ट सोसायटी येथे ‘कला गुलदस्ता’ या निवडक कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. 24 : काव्य, कला, शिल्पकला, चित्रकला या सर्व कला कालातीत गोष्टी असतात.  देशात परचक्र आले असतानादेखील आपल्या देशातील कला टिकून राहिल्या. ईश्वरी देणे असलेल्या कलेला कधी अंत नसतो. त्यामुळे ज्याला जी कला प्राप्त झाली आहे, तिचा त्या व्यक्तीने सर्वोत्तम विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतेच बॉम्बे आर्ट सोसायटी मुंबई येथे ‘कला गुलदस्ता’ या निवडक कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

कला उद्योजिका व व्हिडीओशॉट्स आर्टस् अँड एंटरटेनमेंटच्या संस्थापिका अंजली कौर अरोरा यांच्या पुढाकाराने या एक आठवड्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्वी कलेला राजाश्रय होता. आज कलेला लोकाश्रय आहे. आपल्या घरी भिंतीवर एखादी सुंदर कलाकृती असावी असे सामान्य माणसालादेखील वाटत असते, असे राज्यपालांनी सांगितले. कलाकारांनी स्वतः आशावादी असावे व लोकांनादेखील जगण्याची नवी उमेद द्यावी असे राज्यपालांनी सांगितले.

...तर कलाकार पुनश्च अजिंठा – वेरूळ साकारतील : भगवान रामपुरे

यावेळी बोलताना ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पूर्वीप्रमाणे कलेला राजाश्रय मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त केली. आजही कलाकारांना त्यांच्या उमेदीच्या काळात राजाश्रय मिळाला तर ते एखाद्या पहाडातून अजिंठा-वेरूळ सारखी अजरामर शिल्पे साकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  देशात उत्तमोत्तम कलाकार आजही आहेत. परंतु त्यांचेकडून काम करून घेणारे नाहीत, असे त्यांनी सांगितले

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कलाकारांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनात सहभागी होत असलेले कलाकार वैशाली राजापूरकर, अभय विजय मसराम, राखी शहा व सकीना मंदसौरवाला यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी, सहआयोजक नरेंद्र सिंग अरोरा, कलाकार व कलारसिक यावेळी उपस्थित होते.

Governor Koshyari inaugurates Anjali Arora’s ‘Bouquet of Arts’ Exhibition

Mumbai 24 Governor Bhagat Singh Koshyari inaugurated ‘Bouquet of Arts’ an Exhibition of the work of four promising artists at Bombay Art Society Mumbai. The Exhibition was organised by Videoshots Arts and Entertainment founded by Art Entrepreneur Anjali Kaur Arora.

Speaking on the occasion, Koshyari said works of art such as poetry, painting, music and sculpture are timeless. He said art is the gift of God to mankind. He appealed to artists to identify and nurture the artistic talent given to them by nature. Senior artists Sadashiv Kulkarni, sculptor Bhagwan Rampure and Co Founder of Videoshots Arts and Entertainment Narendra Singh Arora were present.

The Governor felicitated the participating artists Vaishali Rajapurkar, Abhya Vijay Masram Rakhi Shah and Sakina Mandsaurwala.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक – आयुक्त विद्या गायकवाड

Next Post

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन

Next Post
१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications