<
अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाने जळगावकरांचे वेधले लक्ष
जळगाव – (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील कळमसरे येथे इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी,पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे यासह इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
१४ मे रोजी पाचोरा तालुक्यातील कळमसरे येथील चर्मकार समजाच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील नराधमांनी तिचे अपहरण करून,तिला गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.याप्रकरणी पिंपळगाव (हरे.)पोलिसांनी मुलीची फिर्याद नोंदविताना कपोलकल्पित कथा रंगविल्याने जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
या घटनेची सखोल चौकशी करून मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती च्या विविध संघटनांनी एकत्र येवुन अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिती स्थापन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी जोरदार घोषणा देवून आंदोलनकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडले.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना यावेळी मागण्याचे निवेदन सादर करून पिडीत मुलीची फिर्याद कपोलकल्पित स्वरूपाची नोंदविण्यात आल्याने ती रद्द करून नव्याने फिर्याद नोंदविण्यात यावी,पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना आर्थिक व विधी सहाय्य देवून नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, अ.भा.सफाई मजदुर काँग्रेसचे प्रदेश महामंत्री दिलीप चांगरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , संविधान जागर समिती चे संयोजक भारत ससाणे,लहुजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष सुरेश अंभोरे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर ,हरिश्चंद्र सोनवणे,दिलीप सपकाळे,भीम सेनेचे संजय सपकाळे यांच्यासह आशा अंभोरे, निलू इंगळे,जयश्री विसावे,भारती बाविस्कर,निता विसावे,लताबाई अहिरे, सुरेखा वाघ, चित्राबई वारे, इंदू मोरे, जयश्री विसावे, प्रल्हाद विसावे, भगवान बाविस्कर,मधुकर वाघ,प्रा.एम.बी.लाड,ईश्वर लाल अहिरे,अशोक भारुडे,धनराज पवार,नाना मोरे, जितेंद्र विसावे,नीलेश वाघ,वासुदेव वारे,भिकान क्षीरसागर,विजय वानखेडे,संजय देवरे,मंगेश मोरे,प्रा.साळुंखे,प्रा. डॉ.सत्यजित साळवे, अनिल गवळे, प्रा.चंद्रमणी लभाने, विजय सुरवाडे, भारत सोनवणे, वाल्मीक सपकाळे, बाबुराव वाघ,
साहेबराव वानखेडे, सुरेश तायडे,विनोद चव्हाण, गुरु वैदू यांच्यासह जिल्ह्यातील विविध अनुसूचित जाती जमाती संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.