<
जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याचा अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत असुन सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 08468909641 तसेच कार्यालय दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] वर सुद्धा मेल द्वारे पाठवता/नोंदवता येईल.
जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची दिनांक निहाय रचना खालील प्रमाणे राहील.
अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव-पदनाम, मोबाईल क्र., नेमणुक कालावधी पुढील प्रमाणे- संतोष भावसार व.लिपीक 08468909641 दि.25 ते 31 मे 2022, मुकेश सुर्वे, कृषी पर्यवेक्षक, 08468909641 दि. 1 ते 7 जुन, 2022, समाधान देवरे, कृषी सहाय्यक, 08468909641 दि. 8 ते 16 जुन, 2022, संतोष भावसार, व.लिपीक, 08468909641 दि.17 ते 24 जुन, 2022 आणि मुकेश सुर्वे, कृषी पर्यवेक्षक, 08468909641 दि. 25 ते 30 जुन, 2022 असे आवाहन संभाजी कडू ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.