Tuesday, July 22, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘पीसीपीएनडीटी’ वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2022
in राज्य
Reading Time: 2 mins read
‘पीसीपीएनडीटी’ वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/ नूतनीकरण ऑनलाईन होणार

मुंबई, दि. 26 : प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नूतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्‍यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री श्री.टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाईन वेबपोर्टलचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य शासन प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. महाआयटीच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नूतनीकरणासाठी आरोग्य विभागाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. ज्यांना नोंदणी किंवा नूतनीकरण करावयाची आहे अशांनी या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. या सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालयातील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे. या ऑनलाईन सुविधेचा चांगला उपयोग करून केंद्रांच्या नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

ही नवीन प्रणाली विकसीत केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, या वेबपोर्टलद्वारे नोंदणी/ नूतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात उपयुक्त ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य विभागाशी संबंधित इतर सेवा एका प्लॅटफॅार्मवर याव्यात यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ नूतनीकरण करण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पीसीपीएनडीटी कायद्यांअंतर्गत केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ नूतनीकरणासाठी http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in ही कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशू रूग्णवाहिका सेवेत दाखल

आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना संदर्भसेवा देताना अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातील पहिली नवजात शिशू रूग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले.

सर्व साधनसामुग्री, अद्ययावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयात दाखल होणार आहेत.

रुग्णवाहिकेचे फायदे

रुग्णवाहिकेमार्फत नवजात बालकांना संदर्भसेवा देत असताना योग्‍य उपचार सुरु ठेवून इतर आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. कमी वजनाची, कमी दिवसाची बालके, नवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार, सेप्सीस, न्यूमोनिया, जलशुष्कता, हायपोथर्मिया, जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांच्‍या रुग्‍णांना संदर्भित करताना याचा उपयोग होणार असून त्‍यामुळे मृत्यू टाळण्यासाठी मदत होणार आहे.

नवजात शिशुला संदर्भ सेवा देताना कांगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.

नवजात शिशू रुग्णवाहिकेमध्ये Transport Baby Warmer/ Kangaroo Bag उपलब्ध असल्याने Hypothermia मुळे होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

या रुग्णवाहिकेमध्ये Suction Machine, AMBU Bag, Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP) यासाखी यंत्रसामग्री व उपकरणे, औषधसाठा व प्रशिक्षित मनुष्यबळ असल्याने संदर्भीत होताना होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

कार्यपद्धती

या नवजात शिशू रुग्णवाहिका आदिवासी जिल्ह्यातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा यासाठी वापर करण्यात येईल. तसेच या रुग्‍णवाहिकेसाठी २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकीय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे.

नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रामधून कॉल आल्यास नवजात शिशू रुग्णवाहिकेमार्फत संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

Next Post

केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

Next Post
केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications