<
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोक्रा) अंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्या संदर्भात महाराष्ट्रातील फक्त 15 जिल्ह्यामध्ये राबविली जात आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. आपल्या पत्रात प्रकल्पांतर्गत लाभान्वित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप करुन 2261 कोटी रु. खर्च झाल्याचे वृत्तपत्रात दाखवण्यात आला असून त्यात साहित्य पुरवठा कंपनी व कंपनीचे डिलर एजंट व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गळयात हात टाकून कोटयावधी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा केल्या प्रकरणी कार्यवाही करणेबाबत संदर्भ क्र. 1 अन्वये कळविले होते. त्यानुसार सदर संघटनेकडून दिनांक 25 मे, 2022 रोजी उपोषणास बसले होते. संदर्भ क्र. 3 अन्वये दै. लोकमत व दै. सकाळ वृतपत्रा मध्ये दि. 26 मे, 2022 रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी आपणास या पत्रान्वये कळविण्यात येते की, सदर उपोषणास बसलेले श्री. कैलास बजरंग परदेशी (राजपूत), खान्देश व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, व भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे पदाधिकारी यांना संदर्भ क्र. 2 अन्वये पत्रव्यवहार करुन संदर्भ क्र. 1 च्या पत्रामध्ये संपुर्ण प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांबद्दल नमुद केले आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कोणते शेतकरी, कोणते कंपनी डिलर किंवा कृषी अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा स्पष्ट उदबोध होत नव्हाता त्यामुळे त्यांनी दाखल केलेली तक्रार अत्यंत मोघम स्वरुपाची असल्याने त्याची चौकशी यास्तरावरुन तात्काळ तपासणी करणे शक्य नाही.
तरी सदरची तक्रार जळगाव जिल्ह्याशी निगडीत व विशिष्ट शेतकरी, डिलर किंवा अधिकारी यांच्याबाबत असल्यास त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करणे शक्य असल्याचे पत्र संबंधित उपोषणकर्ते यांना देण्यात आली असून त्यात त्यांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.