Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत अनाथ बालकांना साहित्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत अनाथ बालकांना साहित्याचे वाटप

आम्ही तुमच्या सोबत.. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी बालकांना दिला धीर

जळगांव (जिमाका) दि 30 कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनया योजना केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातर्फ़े राबविण्यात येत आहे.दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज जळगावातील 27 बालकांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स कक्षातून संवाद साधला. यावेळी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या तर जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत उपस्थित होत्या. तसेच cdpo विजयसिंग परदेशी, राजेंद्र पाटील, एस आर पाटील, सारिका मेतकर योगेश मुक्कावार, जयश्री पाटील, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद पाटील, वैशाली पाटील, आकाश मराठे, गायत्री अकोलकर, संभाजी राठोड, चेतन पाटील, पवन राठोड, कोमल तायडे तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत अनाथ मुलांच्या कल्याणासाठी आणि सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वर्षे पूर्ण होई पर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. अशा बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या वर्ष पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपयांचा लाभ आणि आयुष्यान भारत योजनेंतर्गत 5 लाखांचा विमा संरक्षण देण्यात आले तर जळगावातील 27 बालकांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले. जळगांव जिल्ह्यातील 27 लाभीर्थी पैकी 25 बालके व त्यांचे नातलग व सांभाळकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित होते व त्यांनी सदर ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कोरोना मध्ये आईवडील गेल्यानंतर आम्हाला खूप पोरकं वाटत होतं. आपले जवळील नातेवाईक देखील दूर झाले होते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी संवाद साधल्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधान यांनी तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितल्यानंतर जी भविष्याची चिंता होती ती दूर झाल्याचे देखील या मुलांनी सांगितले.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बालकांना महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले व आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान द्या असा संदेश मा. पंतप्रधान यांनी बालकांना ऑनलाईन संवाद साधून दिला.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 27 बालकांना आरोग्य विमा हेल्थ कार्ड, पोस्ट खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र व मा. पंतप्रधान यांचे स्नेह पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशी

Next Post

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

Next Post

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo