<
जळगाव -(प्रतिनिधि)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे दिर्घकालावधीपासून प्रलंबित असलेले कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मार्गी लावल्याने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने त्यांचे आभार मानले आहेत.
तसेच सर्व प्रस्ताव एकाचवेळी मार्गी लागावेत यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करून अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरू ठेऊन प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून सर्व प्रस्तावना समितीसमक्ष ठेवून मान्यता दिली. याबद्दल नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहाकडचे पवार यांचे देखील संघटनेतर्फे अभार मानण्यात आले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांचे कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव मार्गी लागावे यासाठी प्रस्तावामधील त्रुटी त्याचवेळी परिपुर्ण करून घेतले आणि सर्व प्रस्ताव समिती समक्षठेवणे योग्य करून दिलेत त्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, डॉ. प्रमोद पांढरे यांना संघटनेतर्फे धन्यवाद. देण्यात आले. त्याबाबतचे महासंघाने नुकतेच आभाराचे प्रसिध्दी पत्रक काढले. प्रस्तावात असलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन प्रस्ताव परिपूर्ण करून घेण्यासाठी अगदी सुट्टीच्या दिवशी देखील काम करणारे सामान्य प्रशासनाचे विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आदींचे दोन्ही संघटनेतर्फे आभार मानण्यात आले आहे.
कालबद्ध पदोन्नती समवेत कर्मचाऱ्यांचे इतर जिव्हाळ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, निकाली निघावे यासाठी प्रत्यक्ष काम करत असलेले दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बहुविध कर्मचारी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब सपकाळे, काष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. अडकमोल, काष्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरळकर, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजय चौधरी, सुनील निकम यांचे आभार मानले. काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, राजेश कुमावत, विजय देशमुख, जयंत पाटील, प्रशांत पार्टील, महेंद्र वानखेडे यांच्या पाठपुराव्यामुळे २७४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागले. याबाबत काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव मिलींद लोणारी, केंद्रीय सहसचिव आर. एस. अडकमोल यांच्या सर्वांचे आभार पत्र काढण्यात आले आहे.