<
दि. ७/६/२०२२ पासुन बस सुरू करा अन्यथा पासुन आमरण उपोषणाचा इशारा. भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.याबाबत वेळोवेळी मागण्या मांडल्या. या मागणीचे निवेदनही यापुर्वी दिलेले आहे. माञ याकडे पाचोरा, भडगाव आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. तरी भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस हया बंद फेर्या तात्काळ पुर्ववत सुरु करण्याबाबत आगार प्रमुख पाचोरा, बसस्थानक प्रमुख ,जळगाव वाहतुक नियंञक, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पाचोरा आगार प्रमुख, भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक आदिंना भडगावचे पञकार अशोक महादु परदेशी यांनी दि. ३०/५/२०२२ रोजी निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत. पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या एस टी कर्मचार्यांच्या संपामुळे सर्वञ बस फेर्या बंदच होत्या. माञ कर्मचार्यांचा संप मिटुनही भडगाव ते वाडे मार्गाच्या बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. भडगाव बसस्थानकामार्गाने लांब पल्याच्या अनेक बस फेर्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. भडगाव तालूक्यातही काही गावांना बसफेर्या सुरु झालेल्या आहेत. विदयार्थ्यांच्या शाळा, परीक्षाकाळातही भडगाव ते वाडे बंद बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याची अनेकदा मागणी करण्यात आली. तसेच दि. १०/५/२०२२ रोजी भडगाव बसस्थानक प्रमुख, पाचोरा आगारप्रमुखांकडे भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. बस फेर्या सुरु करण्याबाबत आपणाकडुनही आश्वासनही देण्यात आले होते. माञ अदयापही भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. एस टी महामंडळाकडुन बस फेर्या सुरु करण्याबाबत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशी, विदयार्थी, नागरीकातुन नाराजी व्यक्त होत आहे. असेही निवेदनात नमुद केलेले आहे. विदयार्थी, प्रवाशांना पायी प्रवास करुन ञास सहन करावा लागला. खाजगी वाहनांनी प्रवास करुन प्रवाशांना आर्थीक भुर्दड सहन करावा लागला. भडगाव ते वाडे बस फेर्या सुरु झाल्या असत्या तर एस टी महामंडळाचेही उत्पन्नात वाढ झाली असती. गाव तेथे बस सेवा हे सार्थ ठरले असते. बस सेवेअभावी प्रवाशांना वंचित राहावे लागले आहे.
भडगावी तालुक्याच्या शासकीय , खाजगीकामी , बाजारपेठेत येणे नागरीकांना ये जा करणे मोठया ञासाचे ठरत आहे. शेतकरी, संजय गांधी आदि शासकीय योजनेचे अनुदान, पगार घेण्यासाठी भडगावी ये जा साठी वृद्ध गोरगरुबांना खाजगी वाहनांनी प्रवास करुन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना काळातही बस सेवा बंदच होत्या. आताही मोठा ञास सहन करावा लागत आहे. एस टी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस फेर्या पाचोरा आगारातुन सुरु केलेल्या आहेत. मग जळगाव ते वाडे बंद बस फेर्या सुरु केल्या असत्या तर प्रवाशांची प्रवासाची सोय झाली असती. एस टी महामंडळाचे उत्पन्नही वाढले असते. तरी एस टी महामंडळाने तात्काळ भडगाव ते वाडे बस फेर्या व जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास टेकवाडे बुद्रुक, वाडे, बांबरुड प्र ब, नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, लोणपिराचे , बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नवे वढधे, जुने वढधे, भडगाव या भागातील जवळपास १८ गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी सोय होणार आहे. जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास वाडेसह, भडगाव, जळगाव पर्यंत अनेक गावांची प्रवाशांची प्रवासासाठी सोय होणार आहे. तरी पाचोरा आगार प्रमुखांनी, एस टी महामंडळाने भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी बंद झालेली फेरी पुर्ववत सुरु करावी. सर्व बसफेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांना बस सेवेचा लाभ दयावा. अन्यथा नागरीकांच्या न्याय व हक्कासाठी दि. ७/६/२०२२ वार मंगळवार पासुन भडगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रवाशी, नागरीकांसह बसण्याचा मार्ग अवलंबविण्यात येईल. व त्यास होणार्या परीणामाची आपली सर्वस्वी जबाबदारी राहील. असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भडगाव पञकार अशोक परदेशी यांची सही आहे.