<
पाचोरा प्रांत डाॅ. विक्रम बांदल व भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना पञकार अशोक बापु परदेशींचे निवेदन. भडगाव वार्ताहर — भडगाव तालुक्यातील वाडे येथील तलाठी पद हे ४ महिन्यांपासुन रिक्तच आहे. तरी वाडे येथे कायमस्वरुपी तलाठी यांची तात्काळ नेमणुक करावी. नागरीक, शेतकर्यांची गैरसोय टाळावी. सोयीचे करावे. अशा मागणीचे निवेदन पाचोरा प्रांत डाॅ. विक्रम बांदल व भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना भडगावचे पञकार अशोक बापु परदेशी यांनी दि. ३१ /५/२०२२ रोजी दिले. हे निवेदन भडगाव तहसिल कार्यालयात देण्यात आले. व सविस्तर चर्चाही करण्यात आली. पाचोरा प्रांत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वाडे हे गाव मोठया लोकसंख्येचे गाव आहे. वाडे येथील तलाठी सजेला वाडे, बांबरुड प्र ब, गोंडगाव भागातील मोठा भाग जोडलेला आहे. वाडे येथील तलाठी रत्नदिप माने यांची ४ महिन्यापुर्वी बदली झालेली आहे. त्यांचे जागी सध्या भोरटेकच्या तलाठी गायञी पाटील यांची प्रभारी तलाठी म्हणुन नेमणुक केलेली आहे. कार्यरत आहेत.
त्यांचेकडे इतरही गावांचा तलाठी पदाचा कार्यभार आहे. प्रभारी तलाठी असल्याने वाडेसह, बांबरुड प्र ब, गोंडगाव भागातील नागरीक, शेतकर्यांना तलाठी कार्यालय बंद वा तलाठी नियमीत वाडे येथे येत नसल्याने सातबारा उतारे, विविध दाखले, नुकसानीचे पंचनामे यासह अनेक कामांना अडचणी येतात. नागरीक, शेतकरी तलाठी यांना इतर नेमणुकीच्या ठिकाणी वा भडगावी तहसिल कार्यालयात चकरा मारत ञास सहन करावा लागतो. प्रभारी तलाठी असल्यामुळे वाडे येथील कामाचा भार पडतांना दिसतो. तरी नागरीक शेतकर्यांची मोठी गैरसोय होतांना दिसते. तरी आपणास्तरावर तात्काळ निर्णय घ्यावा. व वाडे येथे तात्काळ नवीन कायमस्वरुपी तलाठी यांची रिक्त जागेवर नेमणुक करावी. नागरीक, विदयार्थी, शेतकर्यांची गैरसोय दुर करावी. सोयीचे करावे. शासनाचा महसुल वसुलीसही फायदयाचे ठरेल. तरी दखल घ्यावी ही विनंती. असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर वाडे पञकार अशोक बापु परदेशी यांची सही आहे. निवेदन दिल्यावर अशोकबापु परदेशी यांनी पाचोरा प्रांत डाॅ. विक्रम बांदल व भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांचेशी वाडे येथील रिक्त जागा व प्रभारी तलाठी असल्याने येणार्या अडीअडचणी, व्यथा सविस्तर मांडल्या. वाडे येथे कायमस्वरुपी व नविन तलाठी तात्काळ मिळावा. वाडे, बांबरुड प्र ब, गोंडगाव आदि भागातील शेतकरी, नागरीकांशी सोयीचे करावे.अशी विनंती, मागणी केली. भडगाव तालुक्यात तलाठींच्या ९ जागा रिक्त आहेत. माञ तुमच्या मागणीची तात्काळ दखल घेतली जाईल. प्रयत्न करु. अशी ग्वाही पाचोरा प्रांत डाॅ. विक्रम बांदल यांनी बोलतांना दिली. भडगाव तहसिल कार्यालयात निवेदन देतांना सोबत वाडे येथील शशिकांत रामदास महाजन हे ही उपस्थित होते.