<
भडगांव – (प्रतिनिधी) – तांदुळवाडी परिसरात एका वर्षाच्या कालावधीत 10 ते 12 लाखापर्यंत अज्ञात चोरट्यांनी हात फिरवला आहे. त्यात विद्युत जलपरी मोटार, मोटर स्टार्टर, लोखंडी पोल, गुरेढोरे, तसेच तांदुळवाडी जवळील एक लाख 60 हजारांची डिसेंबर 2021 पहिली चोरी, तसेच 29/ 5 )2022 रोजी. फाट्याजवळील रसवंती चे बंद गोडाऊन मधून कुलूप तोडून अथवा मास्टर चाबी लावून दुसरी चोरी डिझेल मशीन साधारणता वीस हजाराची किमतीची असावी. चाळीसगाव रोडा लगत श्री, प्रल्हाद( आप्पा) संतोष पवार यांचे मालकीचे अज्ञात चोरट्यांनी दुसरी वेळेस धाडसी चोरी झाली. त्याच रात्री पेट्रोलियम ची गाडी साधारणता रात्री दोनच्या सुमारास पंचर झाल्याने अमृततुल्य वर पोलीसांची गाडी थांबली होती, त्यानंतर चोरट्यांनी हात फिरवला.
तांदुळवाडी भडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील शेवटचे टोक असून मा. पोलीस निरीक्षक यांना पहिल्या चोरीचा लेखी स्वरूपात अर्ज दिला होता. त्यानंतर गुराढोरांची धाडसी चोरी देखील डिसेंबर 20 21 मध्ये झाली. या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये भुरट्या चोरांचा तपास शुन्यच आहे. तरी पोलीस यंत्रणा झोपेत असून अद्यापही भुरट्या चोरांचा तपास लागलेला नाही, तरी अज्ञान चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक मा. अशोक जी उतेकर साहेब आपण परिसरात येऊन सखोल चौकशी करावी व या भुरट्या चोरांचा बंदोबस्त आठ दिवसाच्या कालावधीमध्ये लावावे अशी मागणी परिसरातून होत आहे .
:- प्राथमिक अंदाज:- भुरट्या चोरांचे धाडस वाढत असल्याकारणाने भुरट्या चोर परसातला परिसरातला असावा.
:- चोरी झालेली मालकांची मुलाखत:- तांदुळवाडी गावातील मामाश्री प्रोव्हिजन चे मालक, पोलिसांना अहोरात्र मदत करणारे पोलीस मित्र, परिसरातील आरोग्य दूत, दैनिक देशदूत पत्रकार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भडगाव तालुका माजी अध्यक्ष. .
श्री, प्रल्हाद एस पवार सतत लोकांच्या संपर्कात राहणारे तरीदेखील त्यांच्या मालकीची धाडसी चोरी करण्यात आली आहे.