<
भडगाव-माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या मार्फत गेल्या सात वर्षांपासुन भडगाव शहर व भडगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.मे महिना म्हटला की प्रचंड ऊन्हाळा असतो.ऊन्हाळ्यात पाणीटंचाई असते.यंदा भडगाव तालुक्यात पाणीटंचाईचे प्रमाण खुपच कमी आहे.ही आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.असे असले तरी भडगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई आहे.हे बघुन माऊली फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी पाणीटंचाई असलेल्या तळवण-तांडा येथे जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेऊन गावातील नागरिकांशी चर्चा करुन तळवण-तांडा येथील गाव हौदामध्ये पाणी पुरवठा करुन पशुंसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला.सदर कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा छोटेखानी कार्यक्रम घेऊन पार पडला.
सदरप्रसंगी माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी,अंचळगावचे सरपंच विद्याधर पाटील,पुरणसिंग पवार,प्रकाश चव्हाणा,माऊली फाऊंडेशनचे स्वयंसेवक संगिता जाधव,वैशाली पाटील,प्रतिभा कुलकर्णी,देवेंद्र पाटील,गणेश पाटील,रविंद्र कुलकर्णी व ग्रामस्थ उपस्थित होते.याबाबतीत अधिक माहिती देतांना माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी सांगितले की माऊली फाऊंडेशनच्या उपक्रमात अजुन एका नविन उपक्रमाची भर पडली.तो उपक्रम म्हणजे टंचाईग्रस्त भागात टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे. मानवता हाच खरा धर्म या ब्रीद वाक्यावर माऊली फाऊंडेशनचे कार्य चालते.यात जे जे सजीव ते सर्व घटक मोडत असतात आणि ही गोष्ट माऊली फाऊंडेशनच्या लक्षात आली.तळवण तांडा येथे पाण्याचे दुर्भक्ष जाणवले.तळवण-तांडा येथे शासनाने पिण्याच्या पाण्याचे ट्रँकर सुरु केले आहे.ज्यांना बोलता येते त्यांचा प्रश्न मिटला.पण ज्यांना बोलता येत नाही त्या मुक्या प्राण्याचं काय?म्हणुन माऊलीचे अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी व संचालिका संगीता जाधव यांच्या हस्ते तळवण तांडा येथे पशुंसाठी पिण्याचे पाणी ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रतिभा कुलकर्णी यांनी माऊली फाऊंडेशन करत असलेल्या कामाची माहिती दिली.संगीता जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व वृक्षारोपणावर मार्गदर्शन केले.तर वैशाली पाटील यांनी पाण्याचे महत्व विषद केले.गणेश पाटील यांनी आभार मानले.यावेळी अंचळगाव येथील सरपंच विद्याधर पाटील,तळवण-तांडा येथील पुरणसिंग पवार,प्रकाश चव्हाण व ग्रामस्थ यांनी अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी व माऊली टीमचे आभार मानले व सोबत ऋणही व्यक्त केले.तसेच आम्ही आगामी काळात आमच्या परीने जे सहकार्य करता येईल ते करु व गावांत कमीत कमी पन्नास वृक्ष लावुन संगोपणाची जबाबदारी घेऊ असे आश्वासन तळवण-तांडा येथील नागरिकांनी दिले.