<
पिंप्राळा – हुडकोतील घरकुल धारकांना अद्याप पर्यत अमृत योजनेअंतर्गत नळ जोळणी कनेक्शन देण्यात आले नाही-जिल्हाध्यक्ष विजय निकम
समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांची निवेदनाद्वारे महापौर जयश्री ताई महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील आयुक्त विद्या गायकवाड यांच्या कडे मागणी
जळगांव – (प्रतिनिधी) – शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत संपूर्ण जळगांव शहरात पाईप लाईन टाकून विविध भागांतील वार्डात – कॉलनी मध्ये मनपा च्या वतीने नळ जोळणी देण्यात आली आहे. त्यांच्या कडून कुठलीही फी आकारणी करण्यात आली नाही. परंतु पिंप्राळा – हुडकोतील घरकुल धारकांकडून 3150 रुपये फी आकारणीची मागणी केली जात आहे. पिंप्राळा – हुडकोतील बहुतांश वर्ग हा मोलमजुरी करणारा वर्ग आहे. त्यात बौद्ध, मुस्लिम ,भिल समाज , मातंग समाज, व इतर समूह आहे. 2 वर्षे कोरोनो च्या काळात या बरेच जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.
हुडकोतील बहुतांश मजूर वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुल धारकांना सुरवाती पासूनच नळ जोळणी देण्यात आली आहे. तरी देखील घरकुल धारक कडून अनधिकृत आहेत. आपले पाणी पट्टी डिमांड रजिस्टर नाही आहे. त्यामुळे आपणांस रक्कम भरावी लागणारच असे सांगण्यात येत आहे. परंतु हा घरकुल धारक यांच्यावर अन्याय आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जून 2010 च्या महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था च्या नागरी भागात असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रत्येकला खाजगी नळ जोळणी व वैयक्तिक शौचालय देण्यात येणार होते त्या 90 टक्के शासन व 10 टक्के लाभार्थी भाग असेल अशी ही योजना देखील मनपा ने हुडको राबविले नाही. जर ही योजना राबविली असती तर हुडकोतील प्रत्येक घरकुल धारकाला नळ जोळणी मिळाली असती व रीतसर स्वतंत्र पाणी पट्टी डिमांड रजिस्टर झाले असते परंतु मनपा च्या चुकीच्या कारभार चा घरकुल धारकांनी का त्रास सहन करायचा त्यामुळे पिंप्राळा – हुडकोतील सर्व घरकुल धारकांना अमृत योजनेअंतर्गत नळ जोळणी द्यावी ही योजना गोरगरीब जनतेसाठी देखील आहे. आपण या योजने पासून अलिप्त ठेऊ शकत नाही घरकुल धारक जर या योजने पासून अलिप्त राहिल्यास मनपा समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समता सैनिक दल जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी दिला आहे. यावेळी भैय्यासाहेब निकम, संजय निकम, श्रावण सपकाळे, रोहित पगारे, अनिल आराख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.