<
जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक- ०२/०६/२०२२ वार गुरुवार रोजी यावल वनविभाग, जळगांव मध्ये वनक्षेत्र – देवझिरी (प्रादेशिक) वनपरिमंडळ – देवझिरी, नियतक्षेत्र- देवझिरी दक्षिण राखीव वनखंड क्र. १६५ मध्ये मध्यप्रदेशातील आणि स्थानिक अवैध अतिक्रमणधारक, अनुसुचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्क कायदा २००५ नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ नुसार दावे दाखल नसलेले अतिक्रमीत शेती आणि लाकडी तयार केलेले झोपड्या काढुन नष्ट करीत अतिक्रमण निर्मुलन करण्याचे काम मा. श्री. प्रवीण चव्हाण अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपुर तथा पालक ए. पी. सी. सी. एफ. धुळे वनवृत्त, धुळे, मा. श्री. पी. कल्याण कुमार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपुर, आणि मा. श्री. डिगंबर पगार, वनसरंक्षक, धुळे वनवृत्त, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली देवझिरी वनक्षेत्रातील कक्ष क्र. १६५ मध्ये ठिक-ठिकाणी असलेले पिक- पेरणी योग्य अतिक्रमीत वनजमीनीवरील २७.०० हेक्टर शेती क्षेत्रावर जेसीबी, यंत्रांच्या सहाय्याने खोल समतल चर खोदकाम करुन अतिक्रमण काढुन टाकण्यात आले. सदर क्षेत्रावर पावसाळ्यात चिलार, प्रोसोपीस, सागर गोटी, निम, साग, सादडा व इतर स्थानिक प्रजातीचे बि पेरणी करण्यात येणार आहे. तसेच परिसरात निर्रमनुष्य असलेल्या ०४ झोपड्यांचे लाकुड काढुन झोपड्या नष्ट करण्यात आले.
सदरचे कार्यवाहीत मा. श्री. ऋषीकेश रावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा, मा. श्रीमती सिमा अहिरे, उपविभागीय अधिकारी- अमळनेर, श्री. अनिल गावीत, तहसीलदार- चोपडा, श्री. किरण दांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अडावद पोलीस स्टेशन, अडावद यांच्या सहकार्याने मा. श्री. पद्मनाभा एच. एस., उपवनसंरक्षक यावल वनविभाग, जळगांव, श्री. प्रथमेश हाडपे, सहा. वनसंरक्षक चोपडा, श्री. गोपाल बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी – देवझिरी, श्री. समाधान सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी- वैजापुर, श्री. विक्रम पदमोर, वनपरिक्षेत्र अधिकारी- यावल पुर्व, श्री. अजय बावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी- रावेर, श्री. आनंदा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारीसंरक्षण व अतिक्रमण निर्मुलन – यावल, श्री. एस. वाय. सपकाळे, मंडळ अधिकारी- चोपडा, श्री. जगदीश कोळंबे, सहाय्यक फौजदार – अडावद पोलीस स्टेशन श्री. नसीर तडवी, हवालदार अडावद पोलीस स्टेशन व कर्मचारी स्टाफ, श्री. अजय पावरा, तलाठी- कर्जाणा, श्री. राजेश बारेला, कोतवाल- कर्जाणा, श्री. विलास साळवे वनपाल – देवझिरी, श्री. नरेंद्रकुमार चित्ते वनरक्षकदेवझिरी दक्षिण आणि एसआरपी वनतुकडी जवान गस्ती पथक, यावल स्टाफ तसेच देवझिरी, वैजापुर, चोपडा, अडावद, यावल पुर्व, रावेर वनक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, अधिसंख्य वनमजुर, रोजंदारी वनमजुर असे ९४ पुरुष महिला अधिकारी / कर्मचारी पथकाने ०५ जेसीबी यंत्राच्या सहाय्याने क्षेत्र २७.०० हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण नष्ट करण्याचे यशस्वीरित्या कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही दरम्यान कोणीही विरोध दर्शविला नाही तसेच हक्क दाखविला नाही. तसेच कोणाचेही वैयक्तिक आर्थिक नुकसान व जिवीतहानी झालेली नाही. तरी सदरची अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही वरिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या करण्यात आलेली आहे.
यावल वनविभाग, जळगांव वनक्षेत्रात असे अवैध अतिक्रमण क्षेत्र आढळुन आल्यास तात्काळ अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कोणीही राखीव वनात अवैध अतिक्रमण करुन नये असे आव्हान करण्यात येत आहे. सदरचे कार्यवाहीबाबत प्रथमेश हाडपे सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव), चोपडा, यावल वनविभाग, जळगांव यांनी अशी माहिती देण्यात आली आहे.