<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- परिवहन विभागामार्फत दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करीता अर्ज, इतर राज्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता अदल, वाहन चालक अनुज्ञप्तीचे दुय्य्मीकरण, वाहन चालक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदला, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नुतणीकरण ह्या ६ सेवा फेसलेस पध्दतीने सुरु करण्यात आल्या आहेत. सदर सेवांचा लाभ घेण्याकरीता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डाशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक आहे.
या सेवांचा लाभ घेण्याकरीता या आधारक्रमांचा वापर करण्यात येणार असुन आधार क्रमांकामधील मोबाईलवर OTP पाठविण्यात येणार असून OTP ची नोंदणी परिवहन या संकेतस्थळाध्ये मेल्यास अनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्र मधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यनंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता खालील नमुद ६ सेवांकरीता अर्जदारास कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नविनअनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराची वेळेची व कागदपत्रांची प्रत काढण्याची आवश्कता नसल्याने पेपरची सुध्दा बचत होणार आहे.
वरील सेवांचा लाभ घेणेसाठी अर्ज करणेसाठी परिवहन विभागाच्या www.parivahan.govin हया संकेतस्थळास भेट देणे,
वाहन विषयक सेवांकरीता वाहनाचे चेसीस व वाहनाचे फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल, तसेच सदर वाहन विषयक सेवा हया फक्त परिवहनेत्त्र संवर्गातील वैयक्तीक नावावर असलेल्या व कर्जबोजा नसलेल्या वाहनांसाठीच असेल
अनुज्ञप्ती विषयक सेवांमध्ये परिवहन संवर्गाचे अनुस्प्ती नुतनीकरणाकरीता ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांनी संगणकीय पोचपावतीसह (acknowledgement) दर गुरुवारी दुपारी 3.00 वाजता उजळणी प्रशिक्षणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील सभागृहात हजर रहावे, जे परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारक उजळणी प्रशिक्षणाकरीता उपस्थिती नोंदवतील त्यांचेच परिवहन अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्यात येईल याची सर्व संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.