<
पाचोरा – येथील सुधन ऍक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रशांत पाटील यांची भाची डॉ. कु. वृषाली पाटील हिने सन 2022 मधील पदव्युत्तर मेडिकल परीक्षा पात्रता परीक्षेत (NEET PG)800 पैकी 590 गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये 1688 क्रमांक पटकावला आहे. डॉ वृषाली तिच्या घवघवीत यशाबद्द्ल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वृषाली पाटील ही पाचोरा व जळगाव येथील मेडिकल स्टोअर चे संचालक व औषधी एजन्सीज चे होलसेलर श्री अतुल पाटील व सौ सविता पाटील यांची सुकन्या तर सुधन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील यांची भाची आहे. तिचे प्राथमिक शिक्षण पाचोरा येथील बुरहाणी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये तर माध्यमिक शिक्षण ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव येथे झालेले आहे. डॉ वृषाली पाटील ह्या मुंबईच्या केईएम हॉस्पिटल मधून एम. बी. बी. एस. ची परीक्षा 75 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या असून वैद्यकीय व्यवसायातील पदव्युत्तर पदवी संपादन करण्यासाठी असलेल्या पात्रता परीक्षेत त्यांनी हे अतुलनीय यश मिळवले आहे. डॉ वृषाली पाटील या सध्या मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटल मध्येच इंटर्नशिप करीत असून एम.एस. किंवा एम.डी. ही पदवी तर पदवी प्राप्त करून ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे.