<
गुजरात (सुरत)- माळी समाज बांधवासह समाजातील सामाजिक संस्थेने केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्रात नव्हेतर संपूर्ण देशात दखल घेतली जात असुन भारतीय संस्कृती टिकविण्यात माळी समाजाचा सिंहाचा वाटा आहेत. आज माळी समाजाचे अस्तित्व टिकविण्याची खुप गरज आहेत हे अस्तित्व टिकवायचे असेल तर एकमेंका बाबत असलेले मतभेद बाजुला करुन सर्वांनी एकञ आले तर निश्चितच समाजात एक मोठी शक्ती निर्माण होवु शकते यासाठी सर्व सामाज बांधवांनी एकञ यावे असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले.
गुजरात राज्यांतील सुरत येथे श्री संत सावता माळी युवक संघ, कार्यक्षेत्र भारत या संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिन साजरा करुन या दिनानिमित्ताने आयोजित विस्तार सभा आयोजित केली होती त्यावेळी सचिन भाऊसाहेब गुलदगड बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय सचिव समाजभूषन सुनिल गुलदगड, शेखर व्यवहारे, सुरत येथील नगरसेवक यशवंत महाजन, मधुकर महाजन, मुरली माळी, गुजरातमधील वापीचे विठ्ठल खरात, अहमदाबादचे रामदास सोनवणे, बडोद्याचे चौधरी, अरुण पवार,आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी गुलदगड यांनी पदाधिकारी यांची निवडी जाहिर केल्या असुन गुजरात प्रदेशाध्यक्षपदी सुरत येथील डॅा.राजेश महाले यांची निवड केली तर करुन तसे नियुक्तीपत्र महालेंना देण्यात आले,तसेच सुरत जिल्हाच्या संघटक पदी वाल्मिक महाजन, संपर्क प्रमुखपदी विलास माळी, सोशल मिडीयाप्रमुख पदी मनोज महाजन , सुरत शहराध्यक्ष पदी हरीष पगारे ,आदिंच्या निवडी यावेळी करुन त्यांना नियुक्तीपत्र उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले की, माळी समाज संपुर्ण भारतात विखुरलेला आहे महाराष्ट्रात माळी, गुजरातमध्ये रामी माळी , दिल्ली राजस्थान मध्ये सैनी, मध्यप्रदेश, झारखंड मध्ये कुशवाह,उत्तरप्रदेश मध्ये मौर्य, जम्मु काश्मिर मध्ये शाक्य,आदि अशा अनेक नावाने माळी समाज हिंदुस्थानाला परीचित आहे. माळी समाजाने आत्ता एक पाऊल पुढे टाकत पोटजाती विसरुन माळी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. पोटजात विसरुन केवळ माळी म्हणुन विवाह लावले पाहिजेत.माळी म्हणुन एकमेकांबद्दल आपुलकी आणि आदर दाखवला पाहिजे. समाजात जर कोणी अडचणीत असेल तर आपण सर्वांनी त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माळी समाजाने संत सावता महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शुरसिंह राजा सैनी, राजा सम्राट अशोक असे अनेक संत,महापुरुष, राजे देशाला दिले आहेत , त्यांचा वारसा चालविणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे शेवटी श्री. गुलदगड म्हणाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी देखील समाज बांधवांना विशेष मार्गदर्शन केले.