Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पशुधनातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक, अत्यल्प, अल्प  भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि या सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गट यांना पशुधनासाठी अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जात आहे. पशुधन दाराशी आल्याने अशा कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान सुधारत आहे.

सद्यस्थितीत गुरांच्या  बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरील झालेल्या आहेत.  त्याचबरोबर शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षी यांच्याही किमती वाढलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे स्वयंरोजगाराचा मार्ग गवसला आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्टीनेही तो फायदेशीर ठरला आहे.

दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या योजनेअंतर्गत संकरित गाय- एच. एफ. किंवा जर्सी म्हैस –मुन्हा किंवा जाफराबादी देशी गाय-गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशुधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

शेळी किंवा मेंढी गट वाटप करण्याच्या योजनेअंतर्गत अंशत: ठाणबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या किंवा मेंढ्या व १ बोकड किंवा नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना वाटप करण्यात येते. एक हजार मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाच्या योजनेअंतर्गत पक्षी  खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८  वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प किंवा अल्प भूधारक शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गटातील योजनेसाठी पात्र आहेत.

लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करते. लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि ३ टक्के अपंगांना प्राधान्य देण्यात येते. निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील. दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत  आधारकार्ड, मोबाईल नंबर, ७/१२ व ८-अ उतारे (अनिवार्य), शिधापत्रिकेची सत्यप्रत आणि सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांम आवश्यक,राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दाखला जोडणे आवश्यक आहे.

विकास मारुती लोंढे, लाभार्थी: विशेष घटक योजनेअंतर्गत मी दोन दुधाळ संकरित गाई खरेदी केल्या आहेत.  हा एक शेतीसाठी जोड धंदा असून यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न नियमितपणे वाढत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Next Post

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित

Next Post
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo