<
जळगाव – (प्रतिनिधी) – के सी ई चे आय एम आर मध्ये “जेंन्डर इक्वालीटी” या विषयावर एम बी ए आणि एम सी ए च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ऐकेडेमिक डिन डॉ तनुजा फेगडे यांनी प्रस्थावना केली.
या विषयावर बोलताना प्रमुख वक्त्या डॉ शमा सराफ यानी जेंडर इक्वालीटीची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. डॉ शमा सराफ म्हणाल्यात
” काही गोष्टी नैसर्गिक असतात तर काही गोष्टी जैविक असतात, काही सामाजिक असतात.
मुलींना 10 व्या ते 13,14 व्या वर्षी पाळी येते
मुलांना 14,15 वर्षानंतर दाढी यायला सुरवात होते.
हे जैविक उदाहरण आहे. 1 ते 5 वर्षे
मुली भातुकली खेळतात (बाहुली प्रेमाने हाताळतात) मुले बंदूक बंदुक खेळतात (मुले बंदुक कशी हाताळतात? बंदुक हातात आली की कोणती भावना आपसुक मनात येते?? त्यांना तसेच खेळ उपलब्ध करुन दिले जातात हे सामाजिक आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्यात काही गोष्टींचा पगडा फार जबरदस्त असतो. But Boyes don’t cry. मुलांनी रडायचे नाही.. मुली रडून मोकळ्या होतात… त्यांना Outlet मिळते. मुले रडू शकत नाही.. सामाजिक दबाव असतो ..पण तिच्या खेळण्यावर आजही खुप घरांमधुन नियंत्रण असते. मुले मैदानी खेळामुळे, पुरेसा ओक्सिजन मिळाल्याने सुद्रुढ बनतात. तिचे मात्र हिमोग्लोबीन आयुष्यभर कमी राहाते..
माणसे आणि प्राणी याच निसर्गाचे भाग आहे
तसेच जेंन्डर इक्वालीटीच्या दिशेने पाऊल पुढे टाकायचे असेल तर, बायकांवरचे जोक.. बायकांवरच्या शिव्या यांना आळा घातला पाहिजे. हे अत्यंत खालच्या दर्जाच्या मानसिकतेचे लक्षण आहे.. पण जेंडर इक्वालीटीच्या दिशेने जायचे असेल तर बाईने बाई पणाच्या साच्यातून बाहेर यायला हवे. पुरुषांनी पुरुषपणाच्या साच्यातून बाहेर यायला हवे.. आणि हेही लक्षात घेतले पाहिजे की, बाईपणाच्या साच्यातून ती बाहेर पडते तेव्हा तिला समजवून घतले जाते का? काही अपवादात्मक केसेस असतीलही पण सर्वसाधारणपणे पुरुष हे पुरुषपणाच्या साच्यातून बाहेर पडुन तिला समजावुन घेत नाही. आजही एका महिलेकडुन एक्सिडेंट झाला तर या बायका म्हणुन उद्धार.. हेच महिला बाॅस बाबत होते.
शारिरीक वयाचा विचार करता, वय वर्षे पन्नाशी नंतर सर्वसाधारणता तिला मोनोपाॅज येतो. त्याला अन्ड्रोपाॅज येतो.
जेंन्डर इक्वालीटीसह समाज घडवताना कामाच्या व्हॅल्यूंची जी वाटणी झाली आहे त्यातील सिमा रेषा पुसल्या पाहिजेत. यानंतर झालेल्या चर्चेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी खुले पणे अनेक प्रश्न विचारले.
या कारेक्रमाचे आभार प्रा उत्कर्षां राणे यांनी मानले.