<
भडगाव-(प्रतिनिधी) – भारताच्या स्वातत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिले आहे पण फक्त मोजक्याच स्वातंत्र्य वीरांचे गेल्या 70 वर्षात पूजन करण्यात येते या आहुती मध्ये बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, आवारी गुरुजी, खाज्या नाईक, पुंजा भिल,जस पालसिंह मुंडा,भीमा नाईक, गोंडवली राणी फुलकंवर, हल्दीबाई भील, राणी दुर्गावती, वीरांगना झलकारीदेवी, या क्रांती वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताच्या स्वातंत्र लढ्यात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, खाज्या नाईक यांनी इंग्रजांना पळता भुई करून सोडले होते.50 लोकां ची टोळी करूंन बंड करून आपले आयुष्याचे बलिदान देऊन विर झाले अत्यंत काटक असलेल्या जंगलयोध्यानी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारले हा जनजातीच्या समाजाचा गौरव शाली इतिहास यावा या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्यात जन जाती चे भरीव योगदान आहे,असे प्रतिपादन प्रा.सुरेश कोळी,संघटक, इतिहास संशोधन परिषद, यांनी व्यक्त केले,ते कोळी महासंघाच्या आदिवासी वीरांचे योगदान या विषयी मार्गदर्शन करताना म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळी महासंघाचे भडगाव तालुका अध्यक्ष अण्णा रघुनाथ कोळी हे होते.
कोळी महासंघ च्या आदिवासी गौरव दिना निमीत्ताने बिरसा मुंडा, तानाजी मालुसरे, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष अण्णा रघुनाथ कोळी, सल्लागार भिवसन कोळी, प्रदिप धना वाघ, कैलाश वाघ पांडुरंग त्रबक कोळी, रतन कोळी, धर्मेंद्र कोळी,अनिल वाल्मीक निकम,अजय कोळी, समाधान कोळी, जितेंद्र कोळी , अजय मोरे, चिंधा कोळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय मोरे यांनी तर सूत्रसंचालन दिलीप चव्हाण व आभार प्रदर्शन अनिल कोळी यांनी व्यक्त केले या वेळी आदिवासी कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.