<
जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :- सन 2022-23 या शैक्षणीक वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षेचे माध्यामातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विदयार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विदयार्थ्यांनी अदयाप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही. त्यांनी ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.