<
डॉ कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातस सांगावी बु येथे उत्तम प्रतिसाद
यावल-(प्रतिनिधी) – आज दिनांक १४ जुन २०२२ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत जवळ सांगावी बु तालुका यावल येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी व ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी डॉ कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला.
या वेळी आधार नसलेल्या वृद्धांच्या हाताला आधार कुणी द्यावा असा प्रश्न डॉ. कुंदन फैगडे यांनी रुग्ण बांधवांना मार्गदर्शन करत असताना प्रश्न चिन्ह निर्माण केला. व आता पर्यंत २४ शिबीर हे आमच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात घेण्यात आले. यावेळी डॉ फेगडे म्हणाले कि माझ्या व माझ्या मित्रपरिवार च्या सहकार्यातून वृद्ध सेवा होत आहे हे मी माझे भाग्य समजतो व यानंतर हि संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने मी व माझा संपूर्ण मित्र परिवार कार्य, सेवा करत राहतील अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समितीचे उवसभापती श्री योगेशदादा भंगाळे होते, तर कार्यक्रमाचे उद्धघाटन श्री. सरपंच रसीद तडवी यांच्या हस्ते भारत मातेच्या व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या प्रसंगी श्री. योगेश भंगाळे, (पंचायत समिती उपसभापती यावल )श्री डॉ कुंदन फेगडे, श्री रशीद तडवी (सरपंच ), श्री दिनेश पाटील, श्री अभय नेमाडे, श्री. प्रकाश सोनवणे, श्री सौ प्रतिभा ताई पाटील, श्री विक्रम मेघे, श्री प्रकाश सोनवणे, श्री प्रशांत चौधरी, श्री बाळू चौधरी, श्री. शरद तायडे, श्री. राजू तडवी, श्री. कुंदन कोळी, श्री. नितीन कोळी, श्री. दिपक कोळी, श्री. प्रशांत बेंडाळे, श्री. मनिष धांडे, श्री. जयंत बोरोले, श्री. जितू कोळी,श्री. उदय पाटील, श्री. भूषण सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती, या शिबिरा साठी सागर लोहार, मनोज बारी विशाल बारी रितेश बारी कुंदन दादा फेगडे मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.