<
पाळधी – (प्रतिनिधी) – येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय तर्फे आज महाविद्यालयाच्या महिला प्राध्यापीकांनी अनोखी पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी केली.
आज शहरी भागात वडाचे वृक्ष नसल्याने पूजेसाठी वडाच्या झाडाच्या फांद्यां तोडून वटसावित्रीची परंपरा पूर्ण केली जाते पण GPS कॅम्पसमधील महिला प्राध्यापका सौ. वाघोदे मॅडम, सौ मोनिका पाटील, सौ जयश्री सूर्यवंशी, यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात नवीन वटवृक्षाचे झाड लावून त्याचे पूजन करण्यात आले तसेच वटपौर्णिमेचे औचित्य साधून त्या वटवृक्षाचे संगोपन करण्याचा निश्चय केला.
प्राध्यापक भुषण पाटील यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून कशा प्रकारे आपण वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवले पाहिजे हे सांगण्यात आले. यावेळी भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री डी. डी. कंखरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापीकांनी परिश्रम घेतले.