<
RTO जळगाव यांच्याकडे मुक्तेश्वर पवार यांनी दाखल केली तक्रार-RTO कार्यालयाच्या कारवाईकडे लक्ष
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे औरंगाबाद येथील ऑटो लाइक सिलेंडर टेस्टिंग सेटंर कंपनी चे संचालक मुक्तेश्वर उत्तंमराव पवार यांनी अतिशय गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार मुक्तेश्वर उत्तंमराव पवार औरंगाबाद या ठिकाणी यांच्या मालकीची ऑटो लाइक सिलेंडर टेस्टिंग सेटंर नावाची कंपनी कार्यान्वित आहे व या ठिकाणी संपुर्ण महाराष्ट्र भरातुन सिलेंडर टेस्टिंग साठी येत असतात व यांचे काम संपुर्ण महाराष्ट्र भर सुरु आहे.
तक्रारदार यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव येथुन दिनांक ०९/०६/२०२२ रोजी मा. गुरव साहेब यांचा फोन आला व त्यांनी कंपनीच्या नावाने असलेले सर्टिफिकेट बाबत चौकशी केली असता असे निदर्शनास आले की सदर सर्टिफिकेट हे बनावट आहे. सदर सर्टिफिकेट हे गाडी क्रमांक MH30P3975 या वाहनाच्या कागदपत्रांना लावण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी तक्रार अर्जात दिलेली आहे. अशा प्रकारे बनावट सर्टिफिकेट तयार करुन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची फसवणूक व दिशाभूल केली आहे. तसेच सदर वाहनधारकाची देखील फसवणुक व दिशाभूल करुन वाहनधारकाच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा प्रकारे संबधित व्यक्तिने आता पर्यंत अनेक वाहनधारकांची पैसे घेऊन फसवणूक केली असेलच यात काही शंकाच नाही. संबंधित व्यक्तीने / एजंटने सदर कंपनीची देखील फसवणूक केली आहे व कंपनीच्या नावाने बनावट दस्तऐवज बनविली आहेत व यापुर्वी देखील बनावट दस्तऐवज बनविले असतिलच अशा प्रकारे वाहनधारकाच्या जिवाशी खेळणे अतिशय चुकिचे आहे.
सदर व्यक्ती असे बनावट दस्तऐवज कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये बनवतो याची देखील सखोल चौकशी करुन या व्यतिरिक्त अजुन काही दुसरे बनावट काम तर करित नाही याची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तसेच सन २०२० पासुन ते आतापर्यंत या व्यक्तीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे सादर केलेले सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी समिती स्थापन करुन चौकशी करावी व संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी व विनंती देखील करण्यात आली आहे.
सदर तक्रारी अर्जाच्या प्रती मा.आयुक्त सो.
परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई, मा. अभिजित राऊत
जिल्हाधिकारी जळगाव., मा.ना.गुलाभवबराव पाटील
पालकमंत्री, जळगाव., मा. आ. सुरेश भोळे (राजुमामा)
आमदार, जळगाव शहर, मा. डॉ. प्रविण मुंढे साहेब
पोलीस अधीक्षक, जळगाव
यांना देखील पाठविण्यात आल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. या प्रकरणावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.