<
यावल – (प्रतिनिधी) – दिनांक २१ जुन २०२२ मंगळवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुका वतीने यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिरा जवळ, पाणी फिल्टर हाऊस, बोरावल रोड,यावल येथे भव्य योग शिबिराचे आयोजन केले होते.
संयुक्त राष्ट संघाच्या बैठकीत भारताचे लोक प्रिय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडून ११ डिसेंबर २०१४ ला हा प्रस्ताव मान्य करून दरवर्षी २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आव्हान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेला केले होते.
आज ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिर जवळ, पाणी फिल्टर हाऊस, बोरावल रोड येथे केले होते. शिबिराचे उद्धघाटन प्राणायामाने करण्यात आले. या शिबिरात यावल शहर व परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबर विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली. त्यांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे योगाचे प्रकारदेखील सादर करण्यात आले. यावेळी ईश्वर पाटील सरांनी सहभागी झालेल्या साधकांना योगा बदल मार्गदर्शन केले.
कोरोनमुक्तीचा उपाय योग हाच पर्याय डॉ कुंदन फेगडे आपल्या मनोगत व्यक करत असताना योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यास देखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते. व जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त, नशामुक्त करण्यासाठी दररोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वांनी योगा करावा असे आव्हान डॉ कुंदन फेगडे यांनी सर्वांना केले
या प्रसंगी श्री नारायण बापू चौधरी ( अध्यक्ष किसान मोर्चा, भाजपा ), श्री विजय मोरे ( जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष ) श्री. उमेश फेगडे ( तालुका अध्यक्ष भाजपा ), श्री उजैनसिंग राजपूत (तालुका सरचिटणीस भाजपा ), श्री विलास चौधरी ( तालुका सरचिटणीस, भाजपा ), श्री योगेश भंगाळे ( माजी उपसभापती, पंचायत समिती ), श्री. डॉ कुंदन फेगडे (माजी नगरसेवक ), श्री किशोर कुळकर्णी, श्री नरेंद्र नेवे, श्री पी एच सोनवणे सर, सौ. वंदना फेगडे ( तालुका अध्यक्ष बेटी बचाव बेटी पढाव ), श्री व्यंकटेश बारी श्री. भूषण फेगडे श्री रितेश बारी ( यावल शहर अध्यक्ष युवा मोर्चा ), मनोज बारी ( उपाध्यक्ष यावल शहर युवा मोर्चा ) श्री. संजय पाटील, श्री गोपाळ कोळी, एकनाथ पाटील श्री. डॉ. प्रशांत जावळे, सौं रोहिणी फेगडे सौ डॉ. जागृती फेगडे सौ. स्नेहल जावळे, आदींची उपस्थिती होती.
या शिबिराच्या यशस्वी करिती सागर लोहार, मनोज बारी विशाल बारी शुभम देशमुख आदींनी परिश्रम घेतले.