<
जळगांव(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठेश्वर हायस्कुल येथे ऑस्ट्रेलिया येथील प्रसिद्ध पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ.अभिमन्यू ओंकार पाटील ( रा. बोरखेडा) यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावीतील 200 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्यांपासून गरीब होतकरु विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने कृती फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाला डॉ.श्रीमती अंजली पाटील यांचे आर्थिक सहाय्य लाभले.
याप्रसंगी, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पक्षिमित्र डी.टी.महाजन यांची उपस्थिती होती. कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, मुख्याध्यापक गोपाल पाटील यांचे हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. श्री मनोरे यांनी सुत्रसंचालन केले. विनोद पाटील, जयेश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.