<
जळगांव-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथील कांताई सभागृह येथे राजर्षी शाहू महाराज जंयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर शाहीरी, पोवाडा या लोककलेद्वारे प्रकाश टाकणारा “जागर सामाजिक न्यायाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा शुभारंभ खान्देशातील लोकशाहीर शाहीर शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री योगेश पाटील व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक सचिन नांद्रे यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ सत्यजित साळवे वरीष्ट समाज कल्याण निरीक्षक आर डी पवार
आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत वरीष्ट समाज कल्याण निरीक्षक आर डी पवार यांनी केले
या कार्यक्रम प्रसंगी आपल्या विद्यालयात मागासवर्गीय मुला तुन दहावी व बारावी मधे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराने मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजने च्या माध्यमातून समाजिक न्यायाचा व समतेचा जागर करणा-या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ सत्यजित साळवे यांनीआपल्या व्माख्याना द्वारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई निर्मिती असलेला “लोकराजा राजर्षी शाहू महाराज “हा माहितीपट या प्रसंगी उपस्थित युवक युवतीना दाखविण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी खान्देशातील सुप्रसिद्ध शाहीर शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी यांनी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावरचा पोवाडा तर जळगाव चे युवा शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी जागर सामाजिक न्यायाचा या लोककलेचा कार्यक्रम सादर केला.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमितजी देशमुख यांच्या संकल्पनेतून व भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने जळगाव ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या विशेष मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जळगावच्या विविध महाविद्यालयातील पाचशे युवकानी सहभाग घेऊन सामाजिक न्यायाचा व समतेचा जागर केला व समता दिंडी काढुन कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यस्ववीते साठी सचिन महाजन, दुर्गेश अंबेकर अरविंद पाटील, अवधुत दलाल यांनी परीश्रम घेतले.