<
भडगांव – (प्रतिनिधी) – अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल च्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिली.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल चे संपादक समाधान मैराळे यांनी आपल्या पोर्टल च्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून व प्रत्यक्षदर्शी समस्यांचे अवलोकन करून नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडल्याचा राग येवून नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या अप्पा यांनी समाधान मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारा मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे
सदर बाब ही गंभीर असल्याने राज्य शासनाने पत्रकारांना संरक्षण कवच म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियम कलम४ अस्तित्वात आणला असून या कायद्यानुसार नगरसेवकावर गुन्हा दाखल करून लोकशाही वाचवावी तसे न केल्यास राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटने विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागिय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे , भडगांव तालुका अध्यक्ष गणेश रावळ ,कार्याध्यक्ष अबरार मिर्झा भडगांव शहर अध्यक्ष अलिम शहा, रिजवान खान व संघटनेचे पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भडगांव तहसिलदार मुकेश हिवाळे तसेच भडगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.