<
दिल्ली – (NEWS NETWORK) – महाविकास आघाडी सरकारला उद्या अग्नी परीक्षा द्यावीच लागणार आहे,सर्वोच्च न्यायालयाने उद्या बहुमत चाचणी घेण्याबाबत निर्णय दिल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निर्णय विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकार आता उद्या बहुमत सिद्ध करणार की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला सांगितलं आहे. राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर कोर्टात तीन तास सुनावणी झाली असता ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.