<
ज्यांचा विरोध तेच सोबत राहीले
अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा आज निकाल आला. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनी सुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालाचे आदेशाचे पालन करण्याचे सांगितले. राज्यपालाने लोकशाहीचा मान राखला.
तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दिड पाऊने दोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधला.मुख्यमंत्री जनतेला संबोधताना म्हणाले की, आता पुढची वाटचाल तुमच्या साथीने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला निधी देत कामाची सुरुवात केली. माझे आयुष्य सा र्थकी लागले आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे.
ज्यांचा विरोध होता त्यांनी साथ दिली
उस्मानाबादचे नाव धाराशीव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यांचे आभार मानतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठरावाला विरोध दिला नाही. मात्र पवार गांधी यांनी मोठे सहकार्य केले. ज्यांचा विरोध त्यांनीच यासाठी साथ दिली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.