<
जळगाव – (प्रतिनिधी) – स्वर्गीय हर्षित विभा महेंद्र कुमार पिपरीया यांच्या द्वितीय पुण्य स्मृतीनिमित्त ज्ञानयोग वर्ग आणि मित्रपरिवार यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर शनिवार दिनांक 2/ 7/ 2022 या दिवशी विसनजी नगर येथे आयोजित केले होते.
स्वर्गीय हर्षित उर्फ बबलू पिपरीया हे स्वतः खूप मोठे रक्तदाते होते त्यांनी स्वतः त्यांच्या जीवन कार्यकाळात असंख्य वेळा रक्तदान केले होते त्यामुळेच त्यांच्या त्या कार्याला मान देऊन कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हर्षित उर्फ बबलू पिपरिया त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या प्रथम जयंती, प्रथम पुण्यस्मृती , द्वितीय जयंती तसेच द्वितीय पुण्यतिथी याप्रकारे चार वेळा मित्रपरिवाराने रक्तदान शिबिर चे आयोजन केले आहे,40 ते 50 लोकांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेतल पिपरिया, ज्ञान पिपरिया, भूमि पिपरिया,ज्योती व्यास, धरीत व्यास, प्रकटेश व्यास, सोनल मेहता, विराग मेहता, जीनल दोशी, दक्ष दोशी ,राजेंद्र पिपरीया, राज पटेल, नवीन पटेल, मैना पटेल, नयना पटेल, यश कामाणी आगम पिपरिया, वंश पिपरिया ,ऋषभ कामदार, हर्षल ठाकूर, गणेश सानप, शुभम सानप, महेश गायकवाड, शिरीष लोहार ,अजय पाटील, विकी भाऊ आणि मित्र परिवारांनी सहकार्य केले.
कार्यक्रमात बऱ्याच जणांनी प्रथम वेळेसच पहिल्यांदाच रक्तदान केले होते भूमि पिपरिया,सौ. जयश्री पाटील, आगम पिपरिया, हर्षल ठाकूर, वंश पिपरिया, ऋषभ कामदार ,सोपान पाटील विकी इतर जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले होते आणि त्यांना आनंदही खूप झाला आणि त्यांनी ठरवले आपण आता दर चार महिन्यांनी रक्तदान करू असाही निश्चय त्यांनी केला.