<
विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून अनुभवले ओझोन वायूचे थर
प्रतिनिधी(जळगांव)- येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर च्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली त्याच बरोबर या ओझोन थराचे महत्त्व व दुष्परिणाम सांगण्यात आले. या ओझोन वायूच्या थरात काही वर्षे पासून कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे व जंगल तोड जाळपोळ, सिमेंट उत्पादन ,जास्त प्रमाणात वृक्ष तोड, विविध प्रकारचे प्रदूषण या सर्वामुळे व औद्योगिक क्रांती अगोदर वातावरणातील ओझोन वायूचे प्रमाणात घट होत आहे. या ओझोन वायूचे घट झाल्यामुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले.त्याच बरोबर वनस्पतीच्या पानांचे आकार लहान होतील. मका, तांदूळ, गहू, सोयाबीन, वाटाणा अशा पिकांचे उत्पादन कमी होऊन, कपड्याचे रंग, प्लॅस्टिकचे फर्निचर, पाइप खराब होतील ही माहिती देण्यात आली तसेच या ओझोन थराच्या वाढ साठी तुलसी व जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षाची लागवड करायला पाहिजे ज्या मुळे ओझोन वायूच्या थरात वाढ होऊन अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरित परिणाम व जीव सृष्टीचा विनाश होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे.असे सरस्वती विद्या मंदिर येथील शिक्षिका सुवर्णलता अडकमोल व सविता बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी शाळेतील मुख्यध्यापिका सौ.वसाने यांनी अनमोल सहकार्य केले व यावेळी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.