<
जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे असून सदर वसतिगृहात सन 2022-23 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयात पदवी / पदविका प्रथम वर्षासाठी शिक्षण घेणाऱ्या बोदवड शहरात शिकणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर प्रवेशासाठी अनुसूचित जाती – 13, वि.जा.भ.ज 1, वि.मा.प्र. 1, अपंग/ अनाथ -1 जागा रिक्त आहेत. सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज घेऊन शालेय विभागासाठी दिनांक 15 जुलै, 2022 पर्यंत कनिष्ठ महाविदयालयासाठी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत बिगर व्यावसायिक महाविदयालयासाठी दिनांक 24 ऑगष्ट 2022 पर्यंत व व्यवसायिक महाविदयालयासाठी दिनांक 30 सप्टेंबर, पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल.
तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे संपर्क साधावा, वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा दिल्या जातील असे डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह बोदवड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.