<
गुण गौरव प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांसोबत बसलेले खलील शेख, फारुक शेख, अब्दुल रउफ , तडवी कुरबान खान मोहब्बत खान आदी दिसत आहे.
जळगाव-(प्रतिनिधी) – शहर महानगरपालिका अंतर्गत मेहरून अकसा नगर येथे उर्दू माध्यमिक शाळा क्रमांक दोन ही सुरू असून त्या शाळेतील दहावी मधील १०५ पैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व १००% निकाल निकालाची परंपरा राखून ठेवली त्याबद्दल त्या माध्यमिक शाळेतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन जळगाव जिल्हा मुस्लिम बिरादरी तर्फे गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे सहाय्यक विस्तार अधिकारी खलील शेख तर प्रमुख अतिथी म्हणून मानियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, महानगर अध्यक्ष सय्यद चाँद, संचालक हारून मेहबूब, अब्दुल रऊफ व रफिक शेख यांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर मनपा माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तडवी कुरबान खान यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दहावी इयत्तेतील कुमारी सुफियान हिने पवित्र कुराण पठणाने केली.
कार्यक्रमाचे उद्देश विशद करतांना बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था द्वारे ज्या शाळा सुरू असून त्या शाळेतील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी चांगली असल्याचे नमूद केले म्हणुन याप्रसंगी शाळेतील शिक्षकांचा सुद्धा भेटवस्तू देऊन मनियार बिरादरी गौरव करीत असल्याची बाब स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना खालील शेख यांनी शाळेच्या यशाबद्दल शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांची चिकाटी हे प्रमुख कारण आहे कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्णपणे सुख सोयी उपलब्ध नसताना सुद्धा त्यांनी जी गुणवत्ता दाखवली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
प्रभारी मुख्याध्यापक तडवी कुरबान खान यांनी आपल्या मनोगतात माध्यमिक शाळा उघडण्यासाठी ते शिक्षक भरती पर्यंत जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीने जे अथक परिश्रम घेतले त्याची नोंद जळगावच्या इतिहासात नोंदली गेली आहे या माध्यमिक शाळेत शिक्षकांना पगार देऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेले आहे व आजही बिरादरीतर्फे प्राथमिक विद्यालयातील मुलांना गणवेश सह शैक्षणिक साहित्य बिरादरी पुरवत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे इन्चार्ज शेख मोहम्मद अलीम यांनी तर आभार क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक इफतेखार अहमद यांनी मानले.
या टॉप टेन विद्यार्थ्यांचा झाला गुणगौरव
अब्दुल कबीर ,उम्मे राहत बाबू खाटीक, सायमा हरून खान, शाहिद सादिक पिंजारी,रुखसना राजू पटेल, आशिया अकबर पटेल, राजीना फिरोज पठाण, नफीसाबी मोहम्मद, ताबिश आरिफ पिंजारी
या शिक्षकांचे सुद्धा झाले गुणगौरव
शेख मोहम्मद अलीम , शिरीन बानो अब्दुल मजीद, सादिया अंजुम शेख, आरेफा इकबाल शाह, इफतेखार अहमद,जकाऊल्ला खान.